आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने कोरोनाच्या पारश्र्वभूमीवर महिला विडी कामगारांना मोफत मास्क वाटप
सोलापूर : संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार जलद गतीने व मोठया प्रमाणात होत आहे. सोलापूरात 70 ते 80 हजार महिला विडी कामगार आहेत. या सर्व विडी कामगार महिला या अशिक्षित असून त्या गरीब मागास व उपेक्षित वर्गातील आहेत. सदर विडी कामगारांना विडी कारखान्यात जाऊन कोरोना विषाणूला कसे प्रतिबंध करता येईल याची माहिली दिली. स्वत:ची कुटुंबाची व परिसरातील नागरीकांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सोलापूर शहरातील विडी कारखान्यातील महिला विडी कामगारांना कोरोना व्हायरस आजाराच्या पारश्र्वभुमीवर मोफत मास्क वाटप करण्यात आले व याबाबत जनजागृती करण्यात आली. यामुळे विडी कारखान्यामध्ये बहुसंख्य महिला विडी कामगार उपस्थित होते.

No comments:
Post a Comment