महिला दिनाच्या निमित्ताने आष्टी मध्ये फक्त महिलांचे रक्तदान शिबिर संपन्न, डॉ. नीता देवानंद गुंड पाटील यांचे आगळे वेगळं संयोजन.
महिला दिनाचे औचित्य साधून आष्टी येथे जि. प. प्रा. शाळेवर फक्त महिलांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी महिलांचा मेळावा ही घेण्यात आला. अध्यक्ष स्तानी, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निशिगंधा माळी होत्या. प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून डॉ. संगीता पाटील पंढरपूर, पंचायत समिती सदस्य डॉ.प्रतिभा व्यवहारे, डॉ. वैशाली वागज शेटफळ, सुप्रिया पवार सोलापूर, शांताबाई सोपल विद्यालय, मोहोळ च्या डिझेल माडम, स्वाती पाटील, आष्टी गावचे सरपंच ऐश्वर्या पाटील, स्वप्नाली निंबाळकर व आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक:- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य डॉ. नीता देवानंद गुंड पाटील यांनी केले व रक्तदानाचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले व 28 महिलांनी रक्तदान केले. मेळाव्या मध्ये प्रचंड महिलांची उपस्थिती होती. अध्यक्षांच्या भाषणामध्ये निशिगंधा माळी यांनी या आष्टी सारख्या ऐतिहासिक गावामध्ये फक्त महिलांचे रक्तदान घेतले या मुळे महिलांचे मनोधैर्य वाडण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना विधेयक कार्यामध्ये व मेळाव्यामध्ये सहभाग होण्याची संधी दिली त्याबद्दल डॉ. नीता गुंड पाटील यांचे कौतुक केले. महिलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मी भारावून गेले आहे व त्यांचे त्यांनी आभार मानले. या वेळी डॉ. संगीता पाटील, डॉ. वैशाली वगज, स्वाती पाटील व स्वप्नाली निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय ब्लड बँक, सोलापूर यांनी रक्तदान घेण्यास सहकार्य केले. उत्तेजनर्थ रक्तदान करणाऱ्यांना भेट वस्तू देण्यात आले. राधिका भुटकर व सीता व्यवहारे यांनी नृत्य सादर केले. सूत्र संचालन मनीषा व्यवहारे यांनी केले. आभार सरपंच ऐश्वर्या पाटील यांनी मानले.

No comments:
Post a Comment