केंद्रीय विद्यापीठातील वीस विद्यार्थी सुखरुप ;आज घरी पाठवणार : जिल्हाधिकारी शंभरकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 16, 2020

केंद्रीय विद्यापीठातील वीस विद्यार्थी सुखरुप ;आज घरी पाठवणार : जिल्हाधिकारी शंभरकर

केंद्रीय विद्यापीठातील वीस विद्यार्थी सुखरुप ;आज घरी पाठवणार : जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर:- कर्नाटकातील गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठातील वीस विद्यार्थ्यांना सुखरुपपणे घरी पाठविण्यात येणार आहे, असे आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.
गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  कर्नाटकांत कोरोना संसर्गांच्या पार्श्र्वभूमीवर सुटी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी आपल्या गावी निघून गेले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली होती. त्यानुसार आज सकाळी त्यांना सोलापूर येथे आणण्यात आले. केगांव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे  ठेवण्यात आले.त्यांपैकी पांच विद्यार्थी चंद्रपूर, सहा विद्यार्थी वर्धा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन असे विदर्भातील पंधरा विद्यार्थी आहेत. नगर आणि पालघर जिल्ह्यांतील प्रत्येकी एक आणि पुणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थी आहेत. विदर्भातील विद्यार्थ्याना उद्या सकाळी घरी पाठविण्यात येणार आहे. पुणे, नगर व पालघर येथील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला आहे. हे पालक विद्यार्थ्यांना उद्या घेऊन जाणार आहेत.केंद्रीय विद्यापीठ गुलबर्गा पासून 23 किलोमीटर दूर आहे. या विद्यार्थ्यांची आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने तपासणी केली त्यांना कसल्याही प्रकारची कोरोना संसर्गाची लक्षणे नाहीत. तसेच ते परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरीकांच्या संपर्कात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages