देशातील गरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर , आदिवासी यांना बेदखल करणाऱ्या कायद्याच्या विरोधात समविचारी मंडळींचा धरणे आंदोलन.
सोलापूर - चुकीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, उद्योगधंदे मोडकळीस निघालेत, भरमसाठ बेकारी वाढली आहे, GST मुळे छोटे मोठे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत, नोटा बंदी सारख्या निर्णयानी बेकारीत भर पडली आहे. अश्यात देश बळकट करण्या ऐवजी सर्व सामान्य देशवासीयांना आपल्या पुर्वजांच्या पुराव्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतवले आहेत. आमच्या सर्व पिढ्यांची हयात याच राज्यात गेली आहे, केवळ त्यांचे लिखीत पुरावे आमच्या कडे उपलब्ध नाहीत. तर हे सरकार आम्हास उपर ठरवत आहे. सरकारचे प्रतिनिधी संसदेत तोंडी सांगत आहेत की आम्ही पुरावे मागणार नाही, हेच वक्तव्य ते कायद्यात रूपांतर का करत नाहीत. जनतेची दिशाभूल करणारं व्यक्तव्य थांबवाव. सर्वसामान्य देशवासीयांना जगण्याचा हक्क अधिकार संपुष्टात आणणाऱ्या CAA NPR आणि NRC कायद्याचा विरोध करण्यासाठी आज हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे असे मत मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी व्यक्त केले. समविचार सभा सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी काॅ रविंद्र मोकाशी, विष्णू गायकवाड, हसीब नदाफ, समिऊल्ला शेख, केशव इंगळे, अॅड गोविंद पाटील, अर्जुन सलगर, नगरसेवक विनोद भोसले, यशवंत फडतरे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, पोपट भोसले, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निर्मला शेळवणे, कार्याध्यक्षा मनिषा नलावडे, उत्तम नवगिरे, व्ही डी गायकवाड, सुरेश नन्नवरे, बाळासाहेब भोसले, अभिमन्यू जाधव, आतीश बनसोडे, सोमनाथ निंबाळकर, मनिष गडदे, अनिरुद्ध वाघमारे, अनिकेत सुळ, भैरव बोळकोटे, कल्याण गव्हाणे, विवेकानंद कंदकुरे, सुजित कोकरे, विनोद शिंदे, साकिब नदाफ, निजामोद्दीन शेख, शफीक काझी आदी उपस्थित होते. आंदोलना नंतर जिल्हाधिकारीना निवेदन देण्यात आले.

No comments:
Post a Comment