चित्रकला करियर घडविण्याचे चांगले माध्यम : तेजस्विनी सोनवणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 16, 2020

चित्रकला करियर घडविण्याचे चांगले माध्यम : तेजस्विनी सोनवणे

चित्रकला करियर घडविण्याचे चांगले माध्यम : तेजस्विनी सोनवणे 

वीरशैव व्हिजन महिला आघाडीतर्फे तेजस्विनीचा  सत्कार 
सोलापूर : चित्रकला ही एक सुंदर कला आहे. काही जणांना चित्रकलेची आवड असते. आवड आणि छद म्हणून चित्र काढत असताना चित्रकला करियर घडविण्याचेही चांगले माध्यम आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे आणि पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तेजस्विनी सोनवणे यांनी केले.उदयोनमुख प्रतिभावंत चित्रकार तेजस्विनी सोनवणे यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांच्या हस्ते तेजस्विनीचा फेटा, शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सोनवणे पुढे म्हणाल्या की राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद वाटला. माझ्या वाटचालीत आई-वडिलांसह मार्गदर्शकांचा सहभाग आहे. भविष्यातही चित्रकला क्षेत्रात चांगले काम करून आपल्या गावाचे, देशाचे नाव लौकीक करण्याचा प्रयत्न असणार आहे.याप्रसंगी सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे,  सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, स्विटी करजगीकर, अश्विनी बिराजदार, वैशाली बिराजदार, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, राहुल बिराजदार, बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते. फोटो ओळी : वीरशैव व्हिजन महिला आघाडीतर्फे तेजस्विनी सोनवणे यांचा सत्कार करताना वर्षा काशेट्टी,माधुरी बिराजदार, पल्लवी हुमनाबादकर, राजशेखर बुरकुले, सोमेश्वर याबाजी, विजयकुमार हेले, राहुल बिराजदार, बसवराज जमखंडी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages