पाचेगाव बुद्रुक येथे तीन कोटीच्या घाणदरा तलावाच्या कामाचा शुभारंभ व भव्य नागरी सत्कार संपन्न
सुमारे तीन कोटीच्या पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथील घाणदरा तलाव पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे नुतन आमदार शहाजी बापू पाटील,माजी आमदार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष दिपक आबा साळुंखे पाटील,शिवसेना नेते उद्योगपती भाऊसाहेब रुपनर,माजी सभापती संभाजी तात्या आलदर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.शिवसेनेचे नुतन आमदार शहाजी बापू पाटील यांचा भव्य नागरी सत्कार पाचेगाव बुद्रक ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच रमेश ढेमरे यांच्या हस्ते करण्यात आला.माजी आमदार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष दिपक आबा साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार पाचेगाव बुद्रक ग्रामस्थांच्या वतीने माजी उपभियंता भरत ढेमरे यांच्या हस्ते करण्यात आला.शिवसेना नेते उद्योगपती भाऊसाहेब रुपनर,माजी सभापती संभाजी तात्या आलदर,ठेकेदार देशमुख यांचे सत्कार करण्यात आले.जलसंधारणाचे गिरी साहेब यांचा सत्कार आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.याप्रसंगी माजी सरपंच रमेश ढेमरे,सरपंच प्रमोद दौंड पाटील यांनी स्मशान भूमी कंपाऊड भिंत,पाचेगाव किडेबिसरी रस्त्याचे डांबरीकरण,घाणदरा तलाव रस्त्याचे डांबरीकरण,माजी सैनिक भवन,घाणदरा तलावात टेंभू योजनेचे बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा या संबधीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांना दिले.आमदार शहाजी बापू पाटील यांनी सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले.तुम्ही कामे सुचवा ती पुर्ण करण्याची जबाबदारी माझी.राजकारणात जय पराजय होत असतात.माय बाप जनतेमुळेच मी आमदार झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.माझ्या राजकारणाची सुरुवात पाचेगाव बुद्रुक येथून झाली.चिकमहुदाच्या शहाजी बापू पाटलाची ओळख सांगोला तालुक्याला सर्वप्रथम पाचेगाव बुद्रुकने करुन दिली.माझी पहिली सभा पाचेगाव बुद्रुक मध्येच झाली.त्या सभेचे अध्यक्ष गणपतराव देशमुख होते.मी आणलेल्या टेंभू योजनेचे सुरुंग पाचेगावच्या बोगद्यात फुटले.त्यामुळे पाचेगाव बुद्रुकचा मॉडेल व्हिलेज म्हणुन विकास करणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.आज घाणदरा तलावाची साठवण क्षमता वाढणार आहे.याच धर्तीवर सांगोला तालुक्यातील तलावांची जलसंधारणाची कामे पुर्ण करणार असल्याचे आमदार शहाजी बापु पाटील यांनी सांगितले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मायबाप जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत आहेत.शांत,संयमी व विकासाभुमिक नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्याचे त्यांनी सांगितले.सध्याचे सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार आहे.सध्या शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आहे.मी सध्या शिवसेनेचा आमदार आहे.पुर्वी काँग्रेसचा आमदार व काही काळ राष्ट्रवादी मध्ये होतो.त्यामुळे मी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीचा ही आमदार आहे.सांगोला तालुक्याच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आणणार असल्याचे सांगितले.माजी आमदार राष्ट्रवादी प्रदेशउपाध्यक्ष दिपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगोल्यात सर्वप्रथम महाआघाडी स्थापन झाली.ते मॉडेल राज्याने स्विकारलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.घाणदरा तलाव हा कै.कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आमदार असताना 1972 सालच्या दुष्काळातील असल्याचे सांगितले.ग्रामपंचायतीच्या निवेदनातील कामे नक्की मार्गी लावली जातील.पाचेगाव बुद्रुकचा मॉडेल व्हिलेज म्हणुन विकास केला जाईल असे सांगितले.जलसंधारणाचे गिरी साहेब व ठेकेदार देशमुख यांनी घाणदरा तलावाचे काम उत्कृष्ट दर्जाचे व लवकरात लवकर पुर्ण केले जाईल असे सांगितले.शिवसेना नेते उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांनी ग्रामस्थांच्या निवेदनातील मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.माजी सभापती संभाजी तात्या आलदर यांनी कोळे भागातील तलावांची साठवण क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले.माजी उपभियंता भरत ढेमरे यांनी अनोखा योगायोग जुळुन आल्यानेच नेतेमंडळी व जनतेच्या आशिर्वादाने आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा आमदार झाल्याचे सांगितलेे.ग्रामपंचायतीच्या निवेदनातील कामांची पुर्तता करण्याची मागणी केली.माजी सैनिक मोहन घोडके यांनी पाचेगाव बुद्रुक येथील सरकारी दवाखान्यात परिचारिका नसल्याने सरकारी दवाखाना बंद अाहे.नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाब लक्षात आणून दिली.आमदार शहाजी बापू पाटील यांनी परिचारिकेची नेमणुक करणार असल्याचे सांगितले.मान्यवरांचे स्वागत कर सल्लागार सर्जेराव ढेमरे यांनी केले.प्रास्ताविक केशव घोडके गुरुजी यांनी केले.आभार माणिक ढेमरे यांनी मानले.यावेळी तात्या,नरळे,बिरा नरळे,दिलीप कोळेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment