कौटुंबिक न्यायालय येथे महिला दिन साजरा
सोलापूर: दि ०९/०३/२०२० सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त कौटुबिक न्यायालय वकील संघ व जिल्हा विधी सेव प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमानाने विशेष कार्यक्रम कथाकथन व पथनाट्य ठेवून
साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश प्राची कुलकर्णी, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांचे स्वागत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वाय. जे. देशमुख यांनी, तर सामाजिक कार्यकर्ते
एस. जे. बुवा यांचे स्वागत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव व न्यायाधीश एस .आर. मोकाशी यांनी, तर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड.मिलिंद थोबडे व सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड बसवराज सलगर यांचे स्वागत कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अॅड नितीन स्वामी यांनी केले.यावेळी मंचावर कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष अँड अशोक तुपाडे,सचिव अॅड यशोधन कणबसकर ,खजिनदार अॅड संदेश कुलकर्णी उपस्तिथ होते, तर सह सचिव जानवी कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले.त्यानंतर अॅड मानसी कुलकर्णी यांनी स्त्री च्या जीवनाशी निगडित कथेवर सुंदर कथाकथन सादर केले तर श्रीमती ताकटे यांनी ताजमहाल याविषयावर उत्कृष्ट असे कथाकथन सादर केले त्यानंतर दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील विध्यार्थानी अप्रतिम व डोळ्याचे पारणे फेडणारे स्त्री, बलात्कार व भारत देश या विषयावर प्रभोदनपर बहारदार पथनाट्य सादर केले व उपस्तीतानी त्यांना टाळ्यांनी दिली. कार्यक्रमास सर्व महिला न्यायाधीश, सरकारी विधिज्ञ , महिला विधिज्ञ , महिला पक्षकार मोठ्या संख्येने उपस्तित होते अशी माहिती अड संदेश कुलकर्णी यांनी दाद दिली.

0 Comments