पाचेगाव बुद्रुक येथे शंभूराजे,कवी कलशांना बलिदान दिनी वंदन
पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथे शंभूराजे,कवी कलशांच्या बलिदान दिनी त्यांनी स्वराज्यासाठी,धर्मासाठी केलेल्या त्यागाच्या व शौर्याच्या स्मृतींचे स्मरण करुन वंदन करण्यात आले.धर्मवीर छत्रपती संभाजी चौकामध्ये शंभूराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन वंदन करण्यात आले.यावेळी सरपंच प्रमोद दौंड पाटील,तंटामुक्ती समिती अध्यक्ष साहेबराव घोडके,माजी उपसरपंच माणिकराव ढेमरे,राजू दौंड,अरुण बिले,शहाजी घोडके,प्रशांत घोडके,अशोक दौंड,अर्जुन सुतार,प्रताप ढेमरे,दिलीप घोडके,संभाजी चव्हाण उपस्थित होते.
0 Comments