कोरोना प्रतिबंधासाठी आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करा.-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2020

कोरोना प्रतिबंधासाठी आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करा.-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

कोरोना प्रतिबंधासाठी आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करा.-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना


  सोलापूर  :-  कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासकीय आदेशाचे कोटेकोर पालन केले जाईल याची काळजी घ्या,  काटेकोर अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.सोलापूर शहरातील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आणि बँक प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख,  पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे  आदी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आणि आदेश जारी केले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करुन गर्दी टाळण्यास प्राध्यान्य  द्या. यासाठी तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने, पान टप-या  31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी पोलीस विभागानी करावी.बँकेच्या शाखेत  एका वेळी जास्तीत जास्त चार ग्राहकांना प्रवेश दिला जावा, बॅकेत गर्दी होऊ नये यासाठी रोख्‍
भरणा करणे रोख काढणे ही दोनच कामे केली जावीत. ही कामे गतीने व्हावीत यासाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बँकेच्या प्रतिनिधीनां  दिल्या. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, बँक ऑफ इंडियाचे अमोल सांगळे आदी उपस्थित होते.
मंगल कार्यालय, क्लब
31 मार्चपर्यंत बंद
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना
 सोलपूर :कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची दुकाने आणि  परमिट रुम (एफ एल -3) आणि क्लब (एफ एल-4 अनुज्ञप्त्या)  31 मार्च 2020  पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे तीन  आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगल कार्यालय आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद करण्याबाबत जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की सोलापूर महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक,  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त, नगरपालिका प्रशासन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी या आदेशाची तात्काळ कार्यवाही करावी. या आदेशाची उल्लंघन  करणारी व्यक्ति, संस्था अथवा संघटना कार्यशीर कारवाईस पात्र ठरेल. संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी याबाबत कारवाई करावयाची आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages