आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, March 22, 2020

आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू
घाबरून जाऊ नकाकाळजी घेण्यासाठी उचलली पाऊले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



·       जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा
·       शासकीय कार्यालयात 5 टक्के कर्मचारीबँकावित्तीय संस्था सुरु   

मुंबई दि 22 : कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोतहा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहेसर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहेत्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात 144 कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केलीमात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चयसंयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावाअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलात्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहेयाची ग्वाही दिली.

अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर

राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहेरेल्वे , खाजगी आणि एसटीबसेस बंद करण्यात येत आहेतलोकल सेवाही बंद करण्यात आली आहेफक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहीलजीवनावश्यक वस्तूअन्नधान्यभाजीपालाऔषधीवीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतीलहे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेते म्हणाले कीवित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25 टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ 5 टक्के करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहेत्याची अजिबात कमतरता नाहीतसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीतत्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नकाअजिबात घाबरून जाऊ नकाअसेही मुख्यमंत्री म्हणालेसंकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहेनिश्चयसंयमजिद्द आणि स्वयंशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचेशिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीकोरोना विषाणुमुळे आपण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्यातरी सर्वांच्या परीक्षेचा कठीण काळ आता सुरु झाला आहेसर्वांनी स्वंयशिस्तीनेसांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहेआतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहेयापुढे ही ते कायम राहू द्या, असेही ते म्हणालेयातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेत्याचा फैलाव रोखणे शक्य आहेया प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही, तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीसर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहेआज जनता कर्फ्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायलाफिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाहीआपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोतगेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसते आहेही संख्या कमी नाही, तर थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणेगर्दी न करणेघराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर बाहेर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

घराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये

आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिकआपले कुटुंबिय आले आहेतआता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाहीत्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याचीप्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहेविलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाहीत्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहेपरंतू परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहेआपल्या कुटुंबियांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहेत्यांच्या हातावर शिक्के मारले आहेतत्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान 15 दिवस बाहेर जाऊ नयेआपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देतांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्याही शांतता आणि संयम आपल्याला 31 तारखेपर्यंत ठेवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

विषाणू जातपात पाहत नाही
आपण मंदिरेधार्मिक स्थळेपर्यटन केंद्रे बंद केलीकारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपातधर्म पहात नाहीकोणताही देश या संकटातून सुटला नाही. म्हणूनच आपण अनेक खाजगी कार्यालयेआस्थापना यांना कामगारांचीकर्मचाऱ्यांची उपस्थितीची संख्या कमी करायला सांगितलीवर्क फ्रॉम होम असे सांगितले, पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यांना जपामाणुसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages