पाईपलाईनच्या भूसंपादनासाठी गतीने संयुक्त मोजणी करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

पाईपलाईनच्या भूसंपादनासाठी गतीने संयुक्त मोजणी करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना


पाईपलाईनच्या भूसंपादनासाठी  गतीने संयुक्त मोजणी करा  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना


सोलापूर दि.10 :-उजनी ते एनटीपीसी दुहेरी पाईपलाईनसाठीच्या भूसंपादनाबाबत संयुक्त मोजणीचे काम गतीने करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज एनटीपीसी थेट पाईपलाईनच्या भूसंपादनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी शैलेश सूर्यवंशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भांडेकर, सहाय्यक संचालक लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेटृटी, जिल्हाअधिक्षक भूमी अभिलेख हेमंत सानपविशेष भूसंपादन अधिकारी सुनील देशपांडे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस सुर्यवंशी यांनी भूसंपादनाच्या कामकाजाबाबतची वस्तुस्थिती सादर केली त्यानुसार पाईपलाईनच्या कामासाठी आवश्यक असणा-या जमिनीचे संपादन करणे आवश्यक असून संयुक्त मोजणी करणे गरजेचे आहे, असे  सांगितले. ही मोजणी गतीने होण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने विशेष पथके स्थापन करावीत. गरज भासल्यास बाह्य यंत्रणेद्वारे काम केले जावे अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या. यावर सानप यांनी मोजणीसाठीचा प्रस्ताव आणि आवश्यक ते शुल्क भरण्याची प्रकिया झाल्यास गतीने संयुक्त मोजणी केली जाईल, असे सांगितले.  मोजणीचे काम गतीने होण्यासाठी बाह्य यंत्रणा घेतल्यास त्याबाबत मोबदला सोलापूर महानगरपालिका देईल असे तावरे यांनी सांगितले. त्याचबरोबर भूसंपादनचा मोबदला देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महानगरपालिकेकडे निधीची मागणी करण्यात यावी त्यानुसार तरतूद केली जाईलअसेही तावरे यांनी सांगितले. पाईपलाईनच्या डिझाईनला प्राथमिक मंजूरी मिळाली असून अंतिम मंजूरी लवकरच मिळेलअसे भांडेकर यांनी सांगितले. पाईपलाईनच्या पंपिंग स्टेशनसाठी उजनी परिसरात 25 गुंठे आवश्यक असल्याचे तावरे यांनी सांगितले. अशी जागा उपलब्ध करुन देण्यास जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गवळी यांनी सांगितले. बैठकीस सोलापूर शहरातून करावयाच्या  उड्डाणपुलाबाबतही चर्चा झाली. उड्डाणपुलामुळे बाधित होणा-या मिळकती, त्यापोटी द्यावा लागणारा भूसंपादन मोबदला, मिळकत धारकांनी घेतलेल्या हरकती, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages