स.म.शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

स.म.शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


स.म.शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


अकलूज ( प्रतिनिधी) येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख  अतिथी म्हणून  महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे उपाअध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी खेळाडू-विद्यार्थी कलाकारांचा गुणवंतांचा खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.  विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते म्हणाले, जोपर्यंत महाविद्यालयीन  विविध स्पर्धेत किंवा उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेत नाही तोपर्यंत गुणवत्ता  सिद्ध करू शकत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रमात प्रत्येकजन सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. पुस्तकाच्या  ज्ञानाबरोबर कौशल्यपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवहारात  उपयुक्त  ठरणारे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. संस्थेने खेड्यापाड्यातील वंचित गोरगरीबाच्या मुलांना गुणवत्तापूर्ण देण्याचे काम करावे व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे हा विचार लोकनेते प्रतापसिंह-मोहिते पाटील यांचा होता. तो विचार प्रत्यक्षात आणण्याचे कार्य महाविद्यालयात होत. आपणही असे गुणवत्ता पूर्ण असे आवाहन त्यांनी केले.   ते पुढे म्हणाले, नातेपुते परिसरात शैक्षणिक व आर्थिक अडचणी लक्षात घेऊन लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी स्पेशल  केस म्हणून १९९१ साली महाविद्यालयाची स्थापना केली. प्रत्येक पिढी घडविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असते.  आई-वडीला नंतर जीवनात  शिक्षक महत्त्वाचे आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील  विकासाचा विचार प्रत्यक्षात आचरणात  आणण्याचे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक विद्यार्थी यांच्याविषयी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली व शैक्षणिक कार्यांचा आढावा घेतला.  महर्षींचे व लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील  यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व मा. पद्मजादेवी मोहिते पाटील व डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असल्याची माहिती दिली.  कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा. मोहन सावंत यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्या प्राध्यापकांनी ग्रंथ निर्मिती केली व  संशोधन करून  पीएच.डी पदवी प्राप्त केली, विद्यापीठ पुरस्कार प्राप्त केले सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलायावेळी कळंबोलीचे सरपंच राजेंद्र पाटील, जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव माणिकबापू मिसाळ, जनसेवा संघटनेचे प्रदेशउपाध्यक्ष  आण्णासाहेब इनामदार, शंकरराव मोहिते पाटील बॅंकेचे चेअरमन सतिश पालकर, युवक जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब शिंदे, जनसेवा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अप्पा रूपनवर, जनसेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा  जाधव, जिल्हा सरचिटणीस  सुधीर रास्ते, युवक जिल्हा सरचिटणीस मयूर माने, निखिल फुले तसेच आजी  माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब निकम यांनी केले तर  प्रा. उत्तम सावंत मान्यवरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages