टेंभुर्णी येथे दोघांवर प्राणघातक हल्ला करुन मोटार सायकल पेटवली पाच जणावर गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

टेंभुर्णी येथे दोघांवर प्राणघातक हल्ला करुन मोटार सायकल पेटवली पाच जणावर गुन्हा दाखल

टेंभुर्णी येथे दोघांवर प्राणघातक हल्ला करुन मोटार सायकल पेटवली पाच जणावर  गुन्हा दाखल




टेंभुर्णी [प्रतिनिधी:]- टेंभुर्णी येथील संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळा जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळेचे  संस्थापक अध्यक्ष कैलास भिकाजी सातपुते (वय ५२) वर्ष रा. टेंभुर्णी व विकी रमेश लोंढे रा. सिद्धार्थ नगर टेंभुर्णी. हे दोघेही त्यांच्या ओळखीचे दादासाहेब गौतम लोंढे रा. हरीनगर बेंबळे यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण असल्याने गेले होते हे दोघेही मोटर सायकल वरून रविवारी रात्री १२:३० च्या सुमारास परत येत असताना बेंबळे-टेंभुर्णी रस्त्यावर  मुळे वस्तीच्या जवळ शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर   कर्मचारी कपिल राजाराम रामगुडे शिक्षक (वय ३८) वर्ष रा. बार्शी. अनिल शंकर लोकरे (वय ४४) वर्ष शिक्षक. पंढरपूर. जगन्नाथ सौदागर कांबळे (वय ४६) वर्ष शिपाई रा. आढेगाव. पांडुरंग विश्वनाथ भंडारी (वय ४०) वर्ष शिक्षक व प्रकाश दशरथ रेवे (वय ४०) वर्ष दोघे  ही रा. टेंभुर्णी या सर्वांनी त्यांची मोटरसायकल अडवली त्यानंतर त्या सर्वांनी माधुरी तरटे यांची सुरू असलेली विभागीय चौकशी मागे घे व तिच्या सहीत प्रमोद कोकरे व जगन्नाथ कांबळे यांच्या नवीन सेवापुस्तक वर सह्या कर हे सर्व बाचाबाची चालू असताना कपिल रामगुडे व अनिल लोकरे यांनी सातपुते यांना मोटर सायकल वरून  ओढून खाली पाडले उभा राहत असताना पांडुरंग भंडारी याने मोटर सायकल वरून चाकूने सातपुते यांच्या गळ्यावर दंडावर पाटीवर धारदार चाकूने  वार केले विकी लोंढे लाही सोडवा सोडवी करत असताना जगन्नाथ कांबळे ,प्रकाश रेवे, यांनी त्याला बाजूला नेऊन काठीने मारहाण केली ते दोघेही जीव वाचवण्यासाठी बाजूला पळून गेले ते गेल्याची खात्री केली असता त्यांनी विकी लोंढे यांच्या होंडा  फॅशन  प्रो  कंपनीची मोटर सायकल ला आग लावून ती पेटवून दिली आसुन या घटनेची खबर  सातपुते सर यांनी त्यांच्या मुलगा शुभम याला दिल्याने त्यांनी ताबडतोब कैलास सातपुते व विकी लोंढे यांना टेंभुर्णी हॉस्पिटल मध्ये न नेहता त्यांना इंदापुर येथिल पानबुडे खाजगी हॉस्पिटलमध्ये  कारमधुन उपचारासाठी नेहले आसुन या घटने मुळे सोलापुर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात  खळबळ उडाली  आसुन ही  घटना रविवारी रात्री १२:३० वाजल्या नंतर घडून ही टेंभुर्णी पोलिसठाण्यात या घटनेची सुत्रे दुपारी बारावाजल्यानंतर फिरली आसुन या घटनेची  सायंकाळी ५:३३ वाजता  उशिरा   भा.द.वी  कलम ३०७, ४३५, ३४१,३५२,१४३,१४७, १४८,१४९. कलमान्वये गुन्हा  पोलीस ठाण्यात दाखल झाला आसुन  अधिक तपास ए.पी.आय राजेंद्र मगदूम हे करीत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages