भरधाव वेगात निघालेल्या टिप्परची दुचाकीला जोराची धडक : दुचाकीस्वर जागीच ठार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

भरधाव वेगात निघालेल्या टिप्परची दुचाकीला जोराची धडक : दुचाकीस्वर जागीच ठार


भरधाव वेगात निघालेल्या टिप्परची दुचाकीला जोराची धडक : दुचाकीस्वर जागीच ठार 



सोलापूर :  होटगी रोडवर भरधाव वेगात निघालेल्या टिप्परने   दुचाकीला जोराची धडक दिली़ या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना होटगी रोडवरील गैबीपीर दर्गाह परिसरात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. आय. जे. कांबळे (रा. पंकज सोसायटी, अंत्रोळीकर नगर परिसर, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांबळे हे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या जीएसटी कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर कांबळे हे याच कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टपाल वाटपाचे काम करत होते अशी माहिती पोलीसांनी दिली़ मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास होटगी रोडवरुन घराच्या दिशेने जाताना भरधाव टिपरने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक काही काळ  विस्कळीत झाली होती. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages