सेवानिवृत्त लिपिक कृष्णा पोफळे यांनी देहदान व नेत्रदानाचा संकल्प करून वाढदिवस केला साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

सेवानिवृत्त लिपिक कृष्णा पोफळे यांनी देहदान व नेत्रदानाचा संकल्प करून वाढदिवस केला साजरा

सेवानिवृत्त लिपिक कृष्णा पोफळे यांनी देहदान व नेत्रदानाचा संकल्प करून वाढदिवस केला साजरा
सांगोला (प्रतिनिधी)-  सांगोला नगरपालिकेतील सेवानिवृत्त लिपिक कृष्णा पोफळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त देहदान व नेत्रदानाचा संकल्प केला असून त्यांनी आपुलकी प्रतिष्ठान कडे मंगळवारी फॉर्म सुपूर्द केला. 
        आपुलकी प्रतिष्ठानकडे अनेक इच्छुकांनी फॉर्म भरून दिले आहेत. सांगोला नगरपालिकेतील सेवानिवृत्त लिपिक  कृष्णा पोफळे यांनी आपला ६७ वा वाढदिवस ११  फेब्रुवारी रोजी साजरा केला.  यानिमित्ताने त्यांनी  देहदान व नेत्रदानाचा फॉर्म भरून  आपुलकी प्रतिष्ठान कडे सुपूर्द केला. फॉर्म भरून दिल्यानंतर उपस्थित सदस्यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना पोफळे याही उपस्थित होत्या.
नेत्रदान, देहदान व अवयवदानाची चळवळ वाढवण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान मार्फत विशेष असे प्रयत्न चालू असून इच्छुकांनी  आपुलकी प्रतिष्ठान कडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages