काश्मिरी युवकांनी पुण्यातील सांस्कृतिक वशैक्षणिक प्रगतीचा आपल्या दऱ्या खोऱ्यातप्रसार करावा- डॉ रवींद्र शिसवे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

काश्मिरी युवकांनी पुण्यातील सांस्कृतिक वशैक्षणिक प्रगतीचा आपल्या दऱ्या खोऱ्यातप्रसार करावा- डॉ रवींद्र शिसवे

काश्मिरी युवकांनी पुण्यातील सांस्कृतिक वशैक्षणिक प्रगतीचा आपल्या दऱ्या खोऱ्यातप्रसार करावा- डॉ रवींद्र शिसवे    






केंद्रीय  गृहमंत्रालय आणि युवा कार्यक्रम - क्रीडा मंत्रालययांच्या संयुक्त निर्देशानुसार पुणे शहरात नेहरू युवा केंद्र, पुणे तर्फे कश्मीरी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन १० ते १६ फेब्रुवारी २०२० दरम्यान करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा  दिनांक ११-०२-२०२० रोजी दुपारी ४.०० वाजता  मुख्य सभागृह , ५ व मजला , जिल्हाधिकारी कार्यालय ,पुणे  येथे पार पडला. या कार्यक्रमात जम्मू काश्मीर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, श्रीनगर, पुलवामा या आतंकवाद प्रभावित जिल्ह्यातून  १३० युवक - युवती तसेच पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील तरुणांना  महाराष्ट्रातील संस्कृती, कला, विज्ञान, शैक्षणिकदृष्ट्या औद्योगिक विकास व बदलती जीवनशैली यांची ओळख करून देऊन युवकांना मुख्य व राष्ट्रीय प्रवाहात आणणे आणि  त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे असा आहे.त्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी महाराष्ट्र मोठ्या शहरांमध्ये मिळवून देण्यासाठी नेहरू युवा केंद्र विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेअसे मत जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या  उदघाटनपर भाषणात भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी  काश्मिरी युवकांना  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात  येण्याचे आवाहन केले. तसेच  केंद्रीय काश्मीर विद्यापीठातील आपल्या आठवनींना  उजाळा देताना  काश्मिरी युवकात असलेल्या जिद्द , चिकाटी , कौशल्य  याचे विशेष कौतुक केले आणि  काश्मीर मधील विविध  उपलब्ध संधींचा उलगडा केला. तसेच पुणे येथील भारती विद्यापीठ काश्मिरी युवकांना ज्ञान व कौशल्य प्राप्तीसाठी नेहमीच प्रयत्नशील असेल अशी ग्वाही दिली. पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी मार्गदर्शन  करताना समाज माध्यमे आणि काही समाजविघातक शक्तींकडून पसरविल्या जाणाऱ्या गैरसमजुतींवर विश्वास न  ठेवता  विकासाच्या प्रवाहात येण्याचे आवाहन केले.तसेच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला विकासाचे माध्यम मानून त्याचा सकारात्मक कार्यासाठी उपयोग करावा असासल्ला दिला. आपल्या भाषणाअंती डॉ रवींद्र  शिसवे यांनी काश्मिरी युवकांनी पुण्यातील सांस्कृतिक व शैक्षणिक  प्रगतीचा आपल्या दऱ्या खोऱ्यात प्रसार करावा अशी इच्छा व्यक्त केली. उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव  साळुंखे, पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे , अपर जिल्हाधिकारी  साहेबराव गायकवाड , निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. जयश्री कटारे,पुना कालेजचे प्राचार्य अन्वर शेख, सी आर पी एफ़चे  सहायक कमांडंट तानाजी  केसरकर, व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी विशेष प्रयत्न केले                                                          









No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages