वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकांत हसबनीस यांचा नेत्रदानाचा संकल्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 11, 2020

वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकांत हसबनीस यांचा नेत्रदानाचा संकल्प

वाढदिवसाच्या निमित्ताने  श्रीकांत हसबनीस यांचा नेत्रदानाचा संकल्प 


सांगोला (प्रतिनिधी) -  सांगोला येथील हसबनीस फुड्सचे मालक  श्रीकांत हसबनीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्रदानाचा संकल्प केला असून नेत्रदानाचा फॉर्म भरून त्यांनी आपुलकी प्रतिष्ठान कडे मंगळवारी सुपूर्द केला. 
            सांगोला शहरात देहदान, अवयवदान व नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली.  या रॅलीनंतर  आपुलकी प्रतिष्ठानकडे अनेक इच्छुकांनी फॉर्म भरून दिले आहेत. सांगोला तालुक्यात तसेच सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यात  हसबनीस फूड्स च्या माध्यमातून  प्रसिद्ध असलेले  श्रीकांत हसबनीस यांनी  आपला  ५० वा वाढदिवस ११  फेब्रुवारी रोजी साजरा केला.  यानिमित्ताने त्यांनी  नेत्रदानाचा फॉर्म भरून  आपुलकी प्रतिष्ठान कडे सुपूर्द केला. फॉर्म भरून दिल्यानंतर उपस्थित सदस्यांनी त्यांचा  वाढदिवसानिमित्त सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा हसबनिस याही उपस्थित होत्या.
नेत्रदान, देहदान व अवयवदानाची चळवळ वाढवण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान मार्फत विशेष असे प्रयत्न चालू असून इच्छुकांनी  संतोष महिमकर (७६२०६५७११२), किशोर पोफळे (९९७०१५२८८४), सुनिल मारडे (९६०४९६९३४३) यांचेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages