माळशिरस तालुका पीपल्स रिपब्लिकन पार्टीची कार्यकारणी जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 10, 2020

माळशिरस तालुका पीपल्स रिपब्लिकन पार्टीची कार्यकारणी जाहीर

माळशिरस तालुका पीपल्स रिपब्लिकन पार्टीची कार्यकारणी जाहीर

 अकलूज ( प्रतिनिधी ) माळशिरस तालुका  पीपल्स रिपब्लिकन पार्टीची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून माळशिरस तालुकाध्यक्षपदी उमेश वाघमारे,युवक तालुकाध्यक्षपदी संतोष गायकवाड तर अकलूज शहराध्यक्षपदी मिलिंद पवार यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या.मागील तालुका कार्यकारणी निवड एका वर्षासाठी करण्यात आली होती. यावेळी माळशिरस तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा उमेश वाघमारे यांची तर युवक तालुकाध्यक्षपदी संतोष गायकवाड व अकलूज शहराध्यक्षपदी मिलिंद पवार यांच्या निवडी सर्वानुमते करून जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी मागील युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड यांना जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीप्रसंगी युवक जिल्हा कार्यकारणीवरील निवडीचे पत्र देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सांगितले.त्यानंतर खालील प्रमाणे निवडी करून निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी अमित जवंजाळ(अकलूज),तालुका उपाध्यक्षपदी शंकर पवार(पिसेवाडी),तालुका संघटकपदी पांडुरंग चव्हाण(पायरीपुल,महाळूग),तालुका संपर्क प्रमुखपदी अनिल खरे(वेळापूर) युवक तालुका सरचिटणीसपदी दयानंद कांबळे,युवक तालुका कार्याध्यक्षपदी सचिन कांबळे,युवक तालुका संपर्क प्रमुखपदी शिवम गायकवाड तर अकलूज शहर कार्याध्यक्षपदी स्वप्निल शिरसट,शहर उपाध्यक्षपदी बजरंग वाघमारे,शहर संपर्क प्रमुखपदी शिवाजी खड़तरे,शहर संघटकपदी नागेश मोरे यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. यावेळी गुरु गायकवाड,सोमनाथ पवार,हनुमंत शिंदे,विनोद सावंत,बाबासाहेब ननवरे,राहुल वाघमारे,मुन्ना शेख,संदिप कांबळे,महावीर निकम यांचेसह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages