हर हर महादेव चा गजर करत कोळी समाजाचा मोठा मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 10, 2020

हर हर महादेव चा गजर करत कोळी समाजाचा मोठा मोर्चा


हर हर महादेव चा गजर करत  कोळी समाजाचा मोठा मोर्चा





सोलापूर - (दि.१०) हर हर महादेव, जय वाल्मिकी असा गजर करीत कोळी समाज बांधवांचा लक्षवेधक मोर्चा आज सोलापूरात निघाला आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर जाहीर सभेत रुपांतर होणार आहे मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कोळी समाज बांधव मोठ्या संख्येनं आले असून मोर्चाचं नियोजन अभुतपूर्व असं आहे. मोर्चात लहान मुलांपासून महिला, वृद्ध, तरुण अशा सर्वांचा समावेश आहे. आमची जात कोणती हे तरी नीट ठरवून द्या असा सवाल मोर्चेकऱ्यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून महादेव कोळी आणि कोळी समाज यांना शासनकर्त्यांकडून न्याय मिळालेला नाही. न्यायालयातही  शासन कोळी समाजाची बाजू भक्कमपणे मांडत नाही. नवीन सोयीसुविधा देण्याऐवजी शासनकर्ते वेगवेगळे पुरावे मागत आहे, अटी घालत आहे. जातीचे दाखले सुलभ पध्दतीनं मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत त्रास दिला जातोय. तर नोकरीला असलेल्यांना आता नोकरीतून काढताना जाती दाखल्याची कारणं दाखविलं जात आहे. यामुळं हजारोजणांचा संसार उघड्यावर आला असल्याची व्यथा मोर्चेकऱ्यांनी मांडली. छत्रपती संभाजी महाराच चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सकाळपासून कोळी समाजबांधव जमत होते. मोर्चात कोणी वैयक्तीक पुढारी नाही, पक्ष, गट, विरहीत असे सारेच समाजबांधव एकत्रीत आले आहेत. सर्वांनी भगव्या रंगाच्या टोप्या घातल्या असून, निळे, पिवळे, भगवे झेंडे हातात घेवून कार्यकर्ते मोर्च्याच्या  अग्रभागी आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages