सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 20, 2020

सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विश्वजित दिलिपकुमार इंगवले यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून गेला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. हिरवे, प्रा. आर. एम. कोळी, प्रा. पी. व्ही. धसाडे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages