शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरामध्ये १७ लाख शिवपार्वती नामजपाचा संकल्प
अकलूज ( प्रतिनिधी ) शंकरनगर- अकलूज येथील शिवपार्वती मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त महानामजपाचे आयोजन करण्यात आले असून हर हर हर हर महादेवा, पार्वती शंकर सदाशिवा ...
हर हर हर हर महादेवा, पार्वती शंकर सदाशिवा...
पार्वती शंकर सदाशिवा, पार्वती शंकर सदाशिवा...याप्रमाणे शिवपार्वती महाजप करण्यात येणार आहे.
सदर दिवशी सकाळी ८ वाजले पासून शिवपार्वती मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना नाम जपामध्ये आपले स्वइच्छेनुसार व उपलब्ध वेळेनुसार सहभाग घेता येईल.त्यासाठी शिवपार्वती मंदिरामध्ये भाविक भक्तांना स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. असे महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सूचित केले असून महाशिवरात्र निमित्त सतरा लाख शिवपार्वती नामजप करण्याचा संकल्प केला आहे.
0 Comments