सोलापुरातील शिवजन्मसोहळ्यात हजारो शिवप्रेमींची गर्दी
सोलापूर : झुलवा पाळणा,पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा, पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा...महाराष्टात आजवर शिवप्रेमींनी अनेक सोहळे केले असतील.पण हजारो सोलापूरकर शिवभक्त महिलांनी मंगळवारी 'न भूतो न भविष्यती' असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजवर अनेक कार्यक्रम झाले. परंतु, मंगळवारी रात्री झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याने नवा इतिहास घडवला.रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची दाटी झाली होती.पहिल्यांदाच भव्य-दिव्य पाळणा कार्यक्रम होत असल्याने प्रत्येकाच्या चेह यावर उत्सुकता आणि आतुरता दिसत होती. महिला पुतळ्याच्या बाजूने बसल्या होत्या.रात्री ११ नंतर महिलांची गर्दी वाढत वाढत एसटी स्टँडच्या पुढे गेली.रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली होती. एका बाजूला महिला तर दुस या बाजूला तरुणांची गर्दी होती.या गर्दीतून जय जिजाऊ,जय शिवरायचा जयघोष होता. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ राजमाता जिजाऊंचा पुतळा ठेवण्यात आला होता.या पुतळ्याच्या अगदी समोरच सजवून ठेवलेला पाळणा होता.त्यात बाळशिवबांची मूर्ती होती.दूरूनच या पाळण्याचे छायाचित्र टिपण्यासाठी महिलांची धडपड सुरू होती.११.४५ वाजता वीरपत्नी,वीरमाता या पाळण्याजवळ आल्या.देशाच्या संरक्षणासाठी त्याग करणा या या मातांचा महापौर श्रीकांचना यन्नम,सूत्रसंचालिका प्रा. ज्योती वाघमारे यांनी कृतज्ञता म्हणून सत्कार केला. रात्री १२ वाजता 'झुलवा पाळणा..पाळणा बाळ शिवाजीचा' हे पाळणा गीत सुरू झाले आणि हजारो महिला,शिवभक्तांनी जल्लोष केला.ज्या क्षणाची सर्व जण वाट पाहत होते तो पाळण्याचा कार्यक्रम सुरू झाला.जमलेल्या महिला, मुले टाळ्या वाजवीत पाळण्याच्या गीताला दाद देऊ लागली.फुले उधळू लागली.आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.'जय जिजाऊ-जय शिवराय','छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष गगनात दुमदुमला.हवेत भगवा होंडा गरगर फिरला आणि पुन्हा जय शिवरायचा जयघोष झाला.
0 Comments