अकलूज येथे सहकार महर्षी पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2020

अकलूज येथे सहकार महर्षी पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर

अकलूज येथे सहकार महर्षी पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर


अकलूज( प्रतिनिधी)सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, माळशिरस पंचायत समिती, अकलुज ग्रामपंचायत, शिवामृत दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती ,शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शिवरत्न शिक्षण संस्था, इंडियन मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती शोभा साठे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, मामासाहेब पांढरे, सुनंदा फुले, अनुपकुमार यादव, डॉ. प्रदीप ढेरे, डॉ. संजय देशमुख,यांच्या हस्ते दिव्यांगांना यावेळेस साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील,आरोग्य सेवांचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख,धनंजय देशमुख, डॉ. मुकुंद जामदार, डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. प्रिया खडतडे, फातिमा पाठावाला, शशिकला भरते, राहुल जगताप, संतराम सोनवणे ,आदित्य आर्वे, जावेद बागवान ,सविता काशीद , विठ्ठलराव गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages