पिककर्जाच्या वितरणासाठी खास मेळाव्यांचे आयोजन -जिल्हा बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2020

पिककर्जाच्या वितरणासाठी खास मेळाव्यांचे आयोजन -जिल्हा बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

पिककर्जाच्या वितरणासाठी खास मेळाव्यांचे आयोजन -जिल्हा बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना


सोलापूरदि१२पिक कर्जाच्या वितरणासाठी खास मेळावे आयोजित कराअशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी  जिल्हास्तरीय बैंक समितीची आज बैठक घेतलीया बैठकीत त्यांनी या सूचना दिल्याबैठकीस  नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिलेअग्रणी  बैंक  व्यवस्थापक संतोष सोनवणेजिल्हा उपनिबंधक कुंदन भोळेकृषि विभागांचें उपसंचालक रवीन्द्र माने आदी उपस्थित होते.रब्बी हंगामात पीक कर्जाचे वितरण जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात झाले आहेया प्रमाणात वाढ होण्याची आवश्यकता आहेउदिष्ट आणि प्रत्यक्ष झालेले वाटप यांच्यात खूप अंतर आहेअसे जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी बैठकीच्या सुरवातीस सांगितलंयावर पीक कर्ज वितरण करण्यात यावे अशा शासनाच्या सूचना आहेतरबी हंगामात उदीष्ट्य आणि पीक कर्ज वाटप यांच्यातील अंतर चिंताजनक आहेत्यामुळे कर्ज वाटपासाठी मेळावे आयोजित कराशेतकऱ्यापर्यत पोहोचा, कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन्‍ करा.   जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही मोहीम हाती घ्याअसे  शंभरकर यांनी सांगितलेजिल्ह्यातील कारखाने उशीरा सुरु झाले आहेत तसेच थकित कर्जामुळे नव्याने कर्ज घेण्यास तांत्रिकदृष्या अपात्र ठरत आहेत.  त्याचबरोबर मागील वर्षी बहुतांश ऊस चारा छावणीसाठी वापरात आणला गेलात्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेतत्यामुळे कर्ज मागणी खालावली आहेयापुढे शेतकऱ्यांनी मागणी करताच कर्ज  पुरवठा करण्यात येईलअसे काही बॅक प्रतिनिधी यांनी बैठकीत सांगितलेपंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा प्रस्ताव सादर करावेतत्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावाअसेही श्रीशंभरकर यांनी सांगितलेमहात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती पोर्टलव पंधरा फेब्रुवारी पुर्वी करावी अशा सूचनाही श्री . शंभरकर यांनी दिल्याज्या शेतकऱ्यानी आधार क्रमांक बॅक खाते क्रमांकाशी संलग्न केलेला नाही त्यांनी त्वरीत संलग्न करुन घ्यावेअसेही श्रीशंभरकर यांनी सांगितले. बैठकीस तहसीलदार श्रीकांत पाटील, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी अमोल सांगळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वडापूरकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे समन्वयक श्रीशैल मेहेरकर, भारतीय स्टेट बँकेचे चंद्रशेखर दिघे, ॲक्सिस बँकेचे सचिन काळोखे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages