सहकार महर्षी कारखान्याच्या ५ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2020

सहकार महर्षी कारखान्याच्या ५ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन

सहकार महर्षी कारखान्याच्या ५ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन

अकलूज ( विलास गायकवाड ) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ५लाख५५ हजार ५५५  व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. ११ फेब्रुवारी अखेर ५ लाख ३७ हजार ५४२ मीटर उसाचे गाळप होऊन ५ लाख ५६ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन झाले.तसेच को-जनरेशन प्रकल्पामध्ये ४ कोटी ९२ लाख ७० हजार ६६१ युनिट वीज निर्माण झाली. त्यापैकी ३ कोटी ५ लाख १३ हजार २३१ युनिट वीज एक्सपोर्ट( विक्री) करण्यात आली आहे.उपपदार्थ प्रकल्प डिस्लरीमध्ये ५० लाख ३७ हजार ३३७  लिटर्स रेक्टिफाईड स्पिरित तसेच २९ लाख ९९ हजार २७८ लिटर इथेनॉल व इ. एन. ए. ८८ हजार लिटर्स उत्पादन झाले आहे. ऍसिटिक ऍसिड प्रकल्पामध्ये २१३मे. टन  एसिटाल्डिहाईड व १८६ ऍसिटिक ऍसिडचे निर्मिती झाली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. कार्यक्रमास चेरमन जयसिंह मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, सुरेश पाटील, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे ,विश्वास काळकुटे, भारत फुले ,भिमराव काळे, बाबुराव पताळे, सतीश शेंडगे,रावसाहेब पराडे, धनंजय एकतपुरे, रामचंद्र सावंत पाटील, सुनील एकतपुरे, नानासाहेब मुंडफने, बाळासाहेब पवार, केशव ताटे, मोहन लोंढे, पांडुरंग कदम ,रामचंद्र चव्हाण, शिवाजी सिद, रामचंद्र ठोंबरे, अभयसिंह माने-देशमुख इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages