सोलापूर शहरासाठी रिंगरुटकरीता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार - आ. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2020

सोलापूर शहरासाठी रिंगरुटकरीता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार - आ. प्रणिती शिंदे

सोलापूर शहरासाठी रिंगरुटकरीता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार - आ. प्रणिती शिंदे



सोलापूर शहरासाठी रिंगरुट व सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर  झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात आ. प्रणिती शिंदे यांची मा. जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक सोलापूर : बुधवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरासाठी त्वरीत रिंगरुट होण्याकरीता व सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात आ. प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले होते. सोलापूर शहरातून होणारया जड वाहतूकीमुळे अनेक अपघात होत आहेत. ही जड वाहतूक शहरातून कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी रिंगरुट संदर्भात आयोजित बैठकीत मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साो., मा. सोमपा आयुक्त दिपक तावरे साो. तसेच प्रकल्प संचालक - राष्ट्रीय महामार्ग  संजय कदम यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सदर रिंगरुटसाठी केंद्र व राज्य शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले आहे. तसेच सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात शासकीय पुनर्वसन योजनेतून त्यांना घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे या बैठकीत ठरले आहे. याप्रसंगी सोमपाचे नगरअभियंता  संदिप कारंजे, नगररचना संचालक  लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी,  गणेश डोंगरे,  नागेश गायकवाड, कौशल्या वाघमारे, इंदू जाधव व बहुसंख्य कोंडा नगर येथील रहिवासी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages