माळशिरस येथे सुरू केलेली लोकसहभागाची एक नाविन्यपूर्ण महाश्रमदान चळवळ... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 14, 2020

माळशिरस येथे सुरू केलेली लोकसहभागाची एक नाविन्यपूर्ण महाश्रमदान चळवळ...

माळशिरस येथे सुरू केलेली लोकसहभागाची एक नाविन्यपूर्ण महाश्रमदान चळवळ...



अकलूज ( विलास गायकवाड ) प्रामाणिक प्रयत्नांना जेंव्हा जेंव्हा कष्टाची साथ आवश्यक असते तेंव्हा राष्ट्रीय सेवा योजना सक्षमपणे पाठीशी उभी राहते.  असाच अनुभव आज आला शंकरराव मोहिते महाविदयालय अकलूजचा विद्यार्थी किरण भांगे, समाधान पराडे व इतर मित्रांच्या साथीने आपण काहीतरी वेगळे करायचे हा ध्यास घेवुन राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेले हे तरूण दरमहिन्याला काहीना काही उपक्रम करीत आलेले आहेत. याच वेगळ्या ध्यासातून त्यांनी माळशिरस येथे सुरू केलेली लोकसहभागाची एक नाविण्यपुर्ण चळवळ. माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या सखुबाई महादजी नाईक निंबाळकर यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धार करायचा निश्चय करून कामाला सुरवात केली. अनेक अडचणी आल्या, अजुनही येताहेत संबधीत कागदपत्रे , पुरावे, अनेक नाना भानगडी करीत या दिव्यातून दुरूस्तीचे काम त्यांनी हाती घेतले आहे. ते पैलतीरावर जाणे आवश्यक आहे, हे ओळखून किरण व त्यांच्या मित्रांनी समाजधुरीणांना आवाहन केले कि कष्टाची गरज तर आहेच पण प्रसंगी पैसा पण पाहीजे यातुनच सुरू झाली लोकसहभागाची चळवळ. अनेकजण आपापल्या परीने मदत करू लागला आहे. पैसा तर हवाच पण काही कामासाठी श्रमदान करणे आवश्यक आहे. हे ओळखून त्यांनी महाविद्यालयाचे राष्टीय सेवा योजना प्रकल्प प्रमुख डाॅ. चंद्रशेखर ताटे-देशमुख, डाॅ चंकेश्वर लोंढे, प्रा दादासाहेब कोकाटे यांना हि कल्पना सांगितली. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गाला आवाहन केले...आपण महाश्रमदान करायला जायचे आहे कितीजण येताय... सादाला प्रतिसाद किती मिळतोय माहीत नव्हते त्यात प्रत्यक्ष आज गुरूवार म्हटले कि गणवेश नाही. चांगले चांगले कपडे घालून नटून थटून काॅलेजल्या आलेल्या लेकी पहिल्यांदा तयार झाल्या, जीन पॅन्ट, टि शर्ट असलेले लेकरंही तयार झाली. दहा, वीस, तीस म्हणता म्हणता १५० च्या पुढे आकडा गेला.समाधी कार्यस्थळावर पोहोचलो वेळ घालविता श्रमदानाला सुरवात झाली. कुणी पाया खांदायला कुदळी, फावडी हाती घेतली तर कुणी पाट्या घेतल्या, कोणी विटा, दगड, माती वर पोहोचविण्या करीता रांग धरली. तर कोणी खापरी चिपरी, उचलली, कोणी चिलारी पेटवून आगटया सुरू केल्या. पाया खांदताना सतीविरगळीची मोठी धोंड बाजूला करताना सर्वांचे पणाला लागलेले कसब नाना क्लुप्त्या करून सर्व बहाद्दरांनी बाहेर काढलीच. त्यांनंतर केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. श्रमदान करताना नागन्नाथ साळवे  व समाधान पराडेने धरलेला अस्सल गावरान गाण्याचा सुर,  कष्टाला बॅकराऊंड म्युझीक देत होता. बघतां बघतां परीसर चकोट झाला. किमान १ लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीचे काम आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलांनी केले. समाजासाठी अंगातून नितळलेल्या घामांच्या धारांना शबासकीची थाप गरजेची असते. या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनीही स्वयंसेवक म्हंणून श्रमदानाला उपस्थीत राहून ती शाबासकीची थाप पाठीवर दिली.पोलीस खात्यातील निकम साहेब, कणसे साहेब व इतरही अधिकारी सहभागी झाले होते.माळशिरस तालुका वकील संघटना या कार्यक्रमात सक्रीय सहभागी झालेली आहे. समाजातील इतर लोकही सहकार्य करीत आहेत.  महाश्रमदान करणेसाठी डाॅ. चंद्रशेखर ताटे, प्रा. दादासाहेब कोकाटे, डॉ. चंकेश्र्वर लोंढे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व शिलेदांरानी प्रयत्न केले.  श्रमदान करताना ...साथी हात बढाना साथीरे एक अकेला थक जायेतो मिलकर बोझ उठना ... या दिलीपकुमारच्या चित्रपटातील ओळी नकळत ओठावर येत होत्या.  वेदनशील समाजभान असलेल्या हातांनी चार तास कष्ट करून *नाॅट मी बट यू* म्हणत परतीचा रस्ता धरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages