आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे स्त्रीशक्तीचे चार आधारस्तंभ - प्रा.पंकज पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 14, 2020

आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे स्त्रीशक्तीचे चार आधारस्तंभ - प्रा.पंकज पवार

आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे स्त्रीशक्तीचे चार आधारस्तंभ - प्रा.पंकज पवार


अकलूज(प्रतिनिधी) स्त्रीशक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ विकसित करून स्त्रीशक्तीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे चार आधारस्तंभ समाजाने भक्कम केले तर समाजात सुराज्य व स्वराज्य दिसेल असे मत प्रा.पंकज पवार यांनी व्यक्त केले. शंकरनगर-अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲण्ड मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत बहीशाल शिक्षण मंडळ आयोजित व्याख्यान व परिसंवाद शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमित भोसले यांनी व्यसनमुक्त व ताणतणाव व्यवस्थापन, प्रा.पंकज पवार यांनी महिला सबलीकरण व स्त्री भ्रुणहत्या आणि रोहित देशमुख यांनी व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य विकास यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य प्रसाद पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.पवार म्हणाले, आज महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर घात करणाऱ्या विघातक प्रवृत्ती असणाऱ्या हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages