युफोरिया- 2k20 वार्षिक स्नेहसंमेलनाने सहयाद्री फार्मसी महाविद्यालयात जल्लोष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2020

युफोरिया- 2k20 वार्षिक स्नेहसंमेलनाने सहयाद्री फार्मसी महाविद्यालयात जल्लोष

युफोरिया- 2k20 वार्षिक स्नेहसंमेलनाने सहयाद्री फार्मसी महाविद्यालयात जल्लोष




सहयाद्री फार्मसी कॉलेज या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगिण व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक, कला व क्रिडा उपक्रम आयोजिले जातात सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलन 2019-20 दिनांक 7 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी रोजी जल्लोषात संपन्न झाले. युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी गाणी, एकपात्री प्रयोग, ग्रुप ड्रामा, सिंगल डांस, ग्रुप डांस, फॅशन शो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग दर्शवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. युफोरिया- 2k20 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन युवा प्रेरणादायी व्याख्याते, समाज परिवर्तनकार  वसंत हंकारे, रावसाहेब केंचप्पा पाटील, अध्यक्ष,  शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संख, जत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले, संचालिका अनिता इंगवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील, उद्योगपती बाळासाहेब आसबे, सदानंद हॉटेलचे मालक  महादेव माने व इतर पालक यांच्या उपस्थितीत सरस्वती पुजनाने झाली. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये  वसंत हंकारे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले त्यांनी सर्वांच्या यशस्वी जिवनातील पालकांचे योगदान सांगितले तसेच प्रत्येकाची पालकासंबंधीची जबाबदारी मार्मिकपणे विषद करुन त्यांनी उपस्थित सर्वांना भावनाविवश केले. तसेच रावसाहेब केंचप्पा पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना नैराष्याच्याविरुध्द लडून यशाचा मार्ग धरावा असे आवाहन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे विविध कलागूणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयात सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी अल्युमिनी असोसिएशन मेथवडे च्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये विनोदी हास्यसम्राट फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी बहारदार असा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी सर्व उपस्थितांना आपल्या विनोदी शैलीने हास्य मनोरंजन केले. यानंतर विद्यार्थ्यांचे विविध कलागूणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण  झाले. या दिवशी महाविद्यालयातर्फे सर्व विद्यार्थी व उपस्थितांना रुचकर व चविष्ट भोजनाची सोय करण्यात आली. या दोन दिवसाच्या सर्व कार्यक्रमामुळे सहयाद्री परिसर सांस्कृतिकमय झाला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. हिरवे, प्रा. बी. बी. गरंडे, प्रा. आर. एम. कोळी, प्रा. पी. व्ही. धसाडे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages