ओबीसी महासभा युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी रोहन सुरवसे- पाटील यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 8, 2020

ओबीसी महासभा युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी रोहन सुरवसे- पाटील यांची नियुक्ती

  ओबीसी महासभा युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी रोहन सुरवसे- पाटील यांची नियुक्ती


 अकलूज( प्रतिनिधी) समाज कार्याचा ध्यास घेतलेले कर्तुत्वान युवा नेतृत्व स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे- पाटील यांची ओबीसी महासभा युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, रोहन सुरवसे पाटील मित्रमंडळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
             रोहन सुरवसे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील आपल्या कोंडबावी गावातून समाजकार्याचा ध्यास घेतला आणि आपल्या पारंपरिक व्यवसायाशी सांगड घालत त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. मनमिळावूपणा, सोज्वळ, नम्रता, संयम, उत्कृष्ट वाणी,उत्कृष्ट विचार सरणी आणि सौजन्य या विविध गुणांमुळे त्यांच्या सानिध्यात तमाम युवावर्ग येऊ लागला तर त्यांच्या सहकार्याने त्यांनी तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.तारुण्याची उर्मी, स्वप्नपूर्तीचा ध्यास आणि ध्येय प्राप्तीची ओढ असलेला युवक सामाजिक चळवळीतील युवा नेतृत्व म्हणून कौतुकास्पद ठरू लागले. त्यांनी करीत असलेल्या सामाजिक कार्याची,  दखल घेऊन ओबीसी महासभेने त्यांची युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केलीअसून त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages