अकलूज पोलीस ठाणे कडून ९ गुंडांना तडीपार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 8, 2020

अकलूज पोलीस ठाणे कडून ९ गुंडांना तडीपार

अकलूज पोलीस ठाणे कडून ९ गुंडांना तडीपार

अकलूज( प्रतिनिधी) मागील पंधरा दिवसापूर्वी अकलूज पोलीस ठाणे कडून १४ गुंडांना तडीपार करण्यात आले असून आज जे गुंड महिलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना, गरीब जनतेला, व्यापाऱ्यांना गुंडगिरी दादागिरी करून त्रास देत होते अशा नऊ गुंडांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती अकलूज पोलीस ठाणे कडून देण्यात आली. आकाश उर्फ अण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, नितीन उर्फ पप्पू बाळू पवार,रहिमान उर्फ सुलतान दिलावर बागवान, सिद्धांत बाळू ताकतोडे, विकास महेश शिंदे, महादेव दिगंबर थोरात, सोमनाथ बिरुदेव रुपनवर ,सागर सोमनाथ सातपुते सर्व राहणार व्यंकटनगर, पंचशीलनगर, जुना बाजार तळ अकलूज या ठिकाणचे असून यांना दोन वर्षासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे तर हे पुन्हा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात दिसल्यास त्यांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात येईल अशी माहिती अकलूज पोलिस ठाण्याकडून देण्यात आलीयावेळी अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर म्हणाले यापुढे जर कोणी अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना, मुलींना ,जेष्ठ नागरिकांना, सामान्य जनतेला ,व्यापाऱ्यांना, खंडणी मागणे व्यापाऱ्यांची दुकाने बंद करणे वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर चिथावणीखोर पोस्ट पाठवने, सरकारी कामात अडथळा करणे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना तडीपार एम.पी.डी. . मोका अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages