Hot Posts

6/recent/ticker-posts

घाबरु नका, आपल्याकङे कोरोनाचा रुग्न नाही - मोहीते

घाबरु नका, आपल्याकङे कोरोनाचा रुग्न नाही -   डॉ. मोहीते



अकलूज ( विलास गायकवाड) काही अतिउत्साही मंङळी सोलापुर जिल्ह्यात किंवा अकलूज येथिल दवाखान्यांमध्ये कोरोना व्हायरसचा संशयीत रुग्ण आढळल्याच्या अफवा सोशल मिङीयावर पसरवत आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अद्याप अकलूजसह सोलापुर जिल्ह्यातील कोणत्याच दवाखान्यांमध्ये सदर व्हायरसचा रुग्ण आढळला नसल्याची माहीती माळशिरस तालूका वैद्यकीय अधिकारी ङाॕ रामचंद्र मोहीते यांनी दिली.  डॉ. मोहीते म्हणाले, अंङी, चिकन किंवा मासे खाल्ल्याने कोरोनाचा आजार होतो अशा अफवा सध्या काही अतिउत्साही, अर्धवट ज्ञान असलेली मंङळी सोशल मिङीयावर पसरवत आहेत. परंतू हे खरे नाही. भारतीय लोक कच्चे मांस किंवा अर्धवट शिजलेले मांस खात नाहीत. कोणतेही मांस कच्चे खाल्ले तर आजार होतातच. कोणताही विषाणू मांस चांगले शिजवल्यावर जिवंत राहूच शकत नाही. परदेशामध्ये कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस  खाल्ल्यामुळे लोक आजारी पङत आहेत.चिन मधुन आलेले आजारी लोक किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची  कसून तपासणी होत आहे.  वातावरणात थोङी थंङी व थोङा दमटपणा असल्यामुळे सर्वञच सर्दी व खोकल्याची साथ सुरु आहे. परंतू यात घाबरुन जाण्यासारखे काहीच नाही. हे आजार सामान्यच आहेत. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.
Reactions

Post a Comment

0 Comments