आदिशक्ति महामंचाचे मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2020

आदिशक्ति महामंचाचे मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण


आदिशक्ति महामंचाचे मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण





आदिशक्ति महामंचाचे मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुणे( प्रतिनिधी) बेकायदेशीर तुकडेबंदी गुंठेवारीचे व बेकायदेशीर फ्लॅटच्या दस्ताची चौकशी होऊन सह दुय्यम निबंधक यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात आदिशक्ती महामंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ६ फेब्रुवारी पासून मुद्रांक महानिरीक्षक पुणे यांच्या कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आदिशक्ती महामंचच्या संस्थापिका अध्यक्ष शिवानी पाटील यांनी दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या सह दुय्यम निबंधक चाबूकस्वार गोडेगाव , सह दुय्यम निबंधक भोर जयवंत मॅडम, सह दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे फुलपगारे , सह दुय्यम निबंधक कातोरे राजगुरुनगर खेड, आदींनी चार्ज घेतल्यापासून शासनाची मोठी फसवणूक करून करोडो रुपये कमवले आहे. तसेच त्यांनी केलेल्या गुंठेवारी बेकायदेशीर दस्त व बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या बिल्डींग मधील फ्लॅटचे दस्त करीत , स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाचा महसूल बुडवला आहे. त्यांनी केलेल्या बेकायदेशीर तुकडेबंदी गुंठेवारीचे व बेकायदेशीर फ्लॅटच्या दस्ताची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत असून या संदर्भात ६ फेब्रुवारीपासून मुद्रांक महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर आदिशक्ती महामंच संघटनेच्यावतीने  कार्यकर्त्यांसमवेत बेमुदत उपोषण करणार असल्याचे शिवानी पाटील यांनी माहिती दिली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages