मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2020

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय 


पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश तसंच नोकऱ्यांममध्ये मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १७ मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. गुणरत्न सदावर्ते व इतरांच्या याचिका सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे सोमवारी सुनावणीसाठी आल्या असताना मराठी कागदपत्रांचे इंग्रजीत भाषांतर आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारने १० आठवडय़ांचा कालावधी मागितला होता. त्याचबरोबर या पीठापुढे शबरीमला व अन्य प्रकरणांवर सुनावणी सुरू होणार असल्याने मराठा आरक्षणप्रकरणीची सुनावणी लांबणीवर गेली. परंतु, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया सुरू करावयाची असल्याने त्यात मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही, या मुद्दय़ावर अंतरिम आदेशासाठी सारडा यांनी सादर केलेल्या याचिकेवर नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे आज सुनावणी ठेवण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपासून मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीला सुरुवात करत याचिका निकाली काढणार असल्याचं सांगितलं आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages