धक्कादायक! सोलापुरात रिक्षाचालकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

धक्कादायक! सोलापुरात रिक्षाचालकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


धक्कादायक! सोलापुरात रिक्षाचालकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असून संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमधील बहुतांश जण रिक्षाचालक आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ ती रडत बसली असताना एका नागरिकाने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं मुलीच्या चौकशीतून समोर आलं. पीडित मुलगी ज्या शाळेत जाते, तिथे विद्यार्थी वाहतूक करणा-या एका तरूण रिक्षाचालकाशी तिची ओळख झाली. अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन त्या रिक्षाचालकाने तिच्याशी प्रेमाचे सूत जमविले. गेल्या जुलैमध्ये पहिल्यांदा त्या रिक्षाचालकाने प्रेमाचे नाटक करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर रिक्षाचालकाचे इतर साथीदारही त्यात एका पाठोपाठ एक सामील होत गेले. कधी वाहनामध्ये तर कधी निर्जन शेतात तर कधी लॉजमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. सुरूवातीला एकाचवेळी तिघा जणांनी तर नंतर चौघा जणांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी पीडित मुलीला मानसिक आधार देत तिच्याकडून माहिती घेतली असता या खळबळजनक प्रकाराला वाचा फुटली. पोलिसांनी पॉस्को आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा केला आहे. तसंच पाच जणांना अटक केली आहे. यामधील बहुतांश आरोपी रिक्षाचालक आहेत. इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages