देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्ची तुटली, अन्... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्ची तुटली, अन्...

देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्ची तुटली, अन्...

सोलापूर - वर्ष दीड वर्षापूर्वी देशातील बहुतांश भागात सत्ता असलेल्या भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांवर सध्या खुर्ची जणू रुसलेली दिसत आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळाली असली तरी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे.कालच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला.एकंदरीत सध्या सत्ता आणि खुर्ची सध्या भाजपावर नाराज असल्याचेच चित्र दिसत आहे.त्याचाच प्रत्यय आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोलापूरमध्ये आला. आज सोलापूर दौयावर आलेले चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निर्धाराबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत होते.त्यावेळी अचानक चंद्रकांत पाटील ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची तुटली.मात्र चंद्रकांतदादांनी वेळीच स्वतःला सावरल्याने ते पडता पडता वाचले.दरम्यान सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना घडलेल्या या घटनेची नंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages