अकलूज पोलिसांनी केले हरवलेले दागिने परत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

अकलूज पोलिसांनी केले हरवलेले दागिने परत

अकलूज पोलिसांनी केले हरवलेले दागिने परत

अकलूज ( प्रतिनिधी) अकलूज पोलीस स्टेशन हद्दीत मैमुन अकबर सय्यद रा. उदयनगर यांचे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी  रिक्षात सोने हरविले होते. अकलूज पोलिसांनी सदर रिक्षाचा शोध घेऊन सय्यद या महिलेचे दागिने परत केले. अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६फेब्रुवारी २०२० रोजी मैमुन अकबर सय्यद रा. उदयनगर येथील महिला रिक्षाने प्रवास करीत असताना तिच्या हातातील पर्स रिक्षातून उतरताना रिक्षातच पडली. त्यामध्ये दोन मंगळसूत्र, कानातील  फुले, अंगट्या दोनअसे एकूण १ लाख५०  हजार रुपये किमतीचे सोने हरवले होते. याबाबत महिलेने अकलूज पोलिस स्टेशनला माहिती दिली असता, अकलूज पोलिस स्टेशनचे पीआय भगवानराव निंबाळकर व पोलीस हवालदार राजेंश गोसावी यांच्या पथकाने दोन दिवस सतत रिक्षाचा शोध घेऊन रिक्षाचालकाकडे गेलेले१ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करून सदर  महिलेस दिले.  हरवलेले दागिने परत मिळाल्याने, महिलेने व तिच्या नातेवाईकाने अकलूज पोलिसांचे आभार मानले.तर  रिक्षाचालकाने स्वतःहून  पर्स हजर करायला हवी होती तरीही त्याने दागिने परत दिल्यामुळे रिक्षाचालकाचे पोलिसांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages