उघड्या व तुंबलेल्या गटारी सांगोलावासीयांचे बिघडवत आहेत आरोग्य, नगरपालिका प्रशासन मात्र स्वछतेच्या गप्पात दंग. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

उघड्या व तुंबलेल्या गटारी सांगोलावासीयांचे बिघडवत आहेत आरोग्य, नगरपालिका प्रशासन मात्र स्वछतेच्या गप्पात दंग.

उघड्या व तुंबलेल्या गटारी सांगोलावासीयांचे बिघडवत आहेत आरोग्य, नगरपालिका प्रशासन मात्र स्वछतेच्या गप्पात दंग.




सांगोला (जगन्नाथ साठे) स्वच्छतेच्या गप्पात दंग असलेल्या नगरपालिका प्रशासनाला सांगोला शहरातील विविध उपनगरात असलेल्या उघड्या व तुंबलेल्या गटारी दिसत नाहीत.या गटारीवर जंतूनाशक फवारणी अथवा पावडर टाकली जात नाही.त्यामुळे शहरातील नागरिकांना  विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. डेंगू,मलेरिया,सर्दी,ताप खोकला,या आजारांमुळे नागरिक मात्र त्रस्त आहेत.स्वच्छ सर्वेक्षनांचा टप्पा पार पडताच नगरपालिका प्रशासन मात्र सुस्त झालेले दिसत आहे. विद्यानगर कॉलनीत असलेल्या प्राथमिक विद्यालयाकडे जाणाऱ्या गटारावर जाळी बसवून घेण्यासाठी वारंवार नगरपालिका आरोग्य निरीक्षकांना सांगून लेखी अर्ज देवून नगरपालिका प्रसासनाकडून अर्जाची दखल घेतली नाही.व गेल्या दोन महिन्यापासून ही गटार उघडी असल्याने या कॉलनीतील लोकांना गटारांची दुर्गंधी येत आहे.विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाताना कसरत करावी लागत आहे तर अनेक दुचाकीस्वार दुचाकी वरून जाताना रस्त्यावरील गटारांचा अंदाज न आल्याने किरकोळ जखमी झालेले आहेत.  धनगरगली येथील मराठी शाळेच्या समोरील गटार ही तुंबलेल्या व उघड्या अवस्थेत आहे.या गटारांचा त्रास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होत आहे. किमान या गटारावर लोखंडी जाळी तरी टाकून  ही गटार बंदिस्त करण्याची मागणी येथील शिक्षकांनी व्यक्त केली आहे.आरोग्य निरीक्षक आणि नगरपालिका प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे.इंदिरानगर झोपडपट्टी येथील अवस्था यापेक्षा वेगळी नाही.त्यामुळे स्वच्छतेच्या सर्वेक्षणात गप्पा मारण्यात दंग असलेल्या नगरपालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष देवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages