दि आर्ट ऑफ लिव्हिंग सांगोला यांच्यावतीने दिव्य सत्संगाचे आयोजन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2020

दि आर्ट ऑफ लिव्हिंग सांगोला यांच्यावतीने दिव्य सत्संगाचे आयोजन.

दि आर्ट ऑफ  लिव्हिंग सांगोला यांच्यावतीने दिव्य सत्संगाचे आयोजन.
 


सांगोला (जगन्नाथ साठे) दि आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा सांगोला यांचे वतीने दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते परमपूज्य  रविशंकरजी (गुरुजी) यांचे परमशिष्य ऋषी नित्यप्रज्ञाजी यांच्या दिव्य सानिध्यात उत्सव परमानंदाचा महासुदर्शन क्रिया दिव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगोला शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.आरोग्य व मन, सदृढ ठेवण्यासाठी या महासुदर्शन क्रिया सत्संगाचा लाभ सांगोला वासीयांना व्हावा,या हेतूने उत्सव परमानंदाचा अनुभव व्हावा,या दृष्टीने या सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर  रविवार 16 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता होणार असून, महासुदर्शन क्रिया सायं ५:३० वाजता सुरू होणार असून यासाठी प्रवेश पास आवश्यक आहे. या  दिव्य सत्संग सोहळ्याचा सांगोला शहर आणि  तालुक्यातील नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन दि आर्ट ऑफ लिविंग शाखा सांगोला यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मासाळ सर 9922970381, विनायक सर-9766051101, राधेश सर--9421073311, अविनाश सर--9773305793,गजानन सर--7083697979 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages