पुनर्वसनासाठी आवश्यक निधी तातडीने देणार -मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 21, 2020

पुनर्वसनासाठी आवश्यक निधी तातडीने देणार -मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

पुनर्वसनासाठी आवश्यक निधी तातडीने देणार -मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार


पुणे,दि.२०:अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांसाठी व चारा टंचाईसाठी लागणारा अत्यावश्यक निधी  तातडीने दिला जाईलअशी ग्वाही बहुजन कल्याण विभागखार जमिनी विकासआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर रामसांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरीकोल्हापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाईपुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाडसोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संजय जाधवसातारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेपुण्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारेनिवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे आदी  उपस्थित होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे महसूल विभागातील पुणेसांगलीकोल्हापूरसोलापूरसातारा या पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. ते म्हणालेया सर्व जिल्ह्यातील पुनर्वसनाची तातडीची कामे लक्षात घेवून  त्यांचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा. त्याचबरोबर यापुढे जिल्ह्यातील मदत व पुनर्वसनाच्या कामांबाबतचा मासिक अहवालही पाठविणँयाच्या सूचना त्यांनी दिल्या. उपलब्ध करण्यात येत असलेल्या तातडीच्या मदतीमध्ये अत्यावश्यक असलेल्या निधी बाबत अहवाल देवून उर्वरित आवश्यक निधी तातडीने संबंधितांना देण्यात येईल. या पाचही जिल्ह्यांतील कमी पडत असलेल्या निधीचा आढावा घेवून तो तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.  बहुजन कल्याण विभागाच्या विविध कामांचा आढावाही त्यांनी घेतला. या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages