Hot Posts

6/recent/ticker-posts

आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी सहज यश संपादन करू शकतात- शितलदेवी मोहिते पाटील

आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी सहज यश संपादन करू शकतात- शितलदेवी मोहिते पाटील 

अकलूज( विलास गायकवाड ) आत्मविश्वास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आयुष्यात कधीही पराभव होऊ शकत नाही.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. देखण्या इमारतीपेक्षा आज तज्ञ शिक्षकांची गरज आहे.तरच विद्यार्थी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल असे प्रतिपादन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांनी केले. विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अकलूज या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शपथ ग्रहण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के इनामदार ,डॉ. रामचंद्र मोहिते ,डॉ. निवांत हराळे, डॉ. तानाजी कदम ,डॉ. अंजली कदम ,शिवदास शिंदे ,पराग गायकवाड, अश्रफ शेख,प्राचार्य प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शितलदेवी मोहिते पाटील पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आत्मविश्वास अंगी बाळगला पाहिजे. प्रत्येक क्षेत्राला सामोरे जाताना आत्मविश्‍वासाने सामोरे गेले पाहिजे. यावेळी डॉक्टर इनामदार म्हणाले की, परिचारक आणि परिचारिका म्हणजे आरोग्यसेवेचे आधारस्तंभ असून यानिमित्ताने मानव सेवा करण्याची उचित संधी प्राप्त होते.सध्या नर्सिंगला जगभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. यावेळी शैक्षणिक व अन्य स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.तुषार केदार ,प्रज्ञा सोरटे ,ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments