Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी चेतनसिंह केदार--सावंत यांची निवड

भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी चेतनसिंह केदार--सावंत यांची निवड 





सांगोला (तालुका प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी युवा नेते, माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक चेतनसिंह केदार-सावंत यांची पत्रकार परिषदेत निवड करण्यात आली. मंगळवारी सांगोला येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार, जिल्हा संघटक राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या नूतन तालुकाध्यक्षपदी चेतनसिंह केदार-सावंत यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यात पदाधिकारी निवडीसंदर्भात अनेक बैठका सुरू आहे. सांगोला तालुक्यात देखील भाजपचे नूतन पदाधिकारी निवडीसंदर्भात बैठका झाल्या. मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग येथे भाजपची पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा संघटन सरचिटणीस राजकुमार पाटील, सांगोला मंडल प्रभारी आणि जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, युवा नेते अभिजित नलवडे, शिवाजी गायकवाड, शहराध्यक्ष आनंद फाटे, राजश्री नागणे, शीतल लादे, वैजयंती देशपांडे, साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, डॉ.विजय बाबर, ग.भी.मिसाळ, माजी उपसरपंच विठ्ठल केदार, संजय केदार, दत्तात्रय जाधव, किरण सावंत, विश्वभंर केदार, दीपक केदार, धर्मराज केदार, माजी सरपंच नानासाहेब केदार, दत्ता टापरे, उद्योगपती संजय पाटणे, बाळासाहेब सावंत, भारत केदार, भालचंद्र भंडारे, सुरेश चौगुले, उत्तम चौगुले, दत्ता बहीरे, पप्पू पाटील, सूर्याजी खटकाळे, नागेश जोशी, लक्ष्मीकांत लिगाडे, अनिल केदार, राहुल केदार, विनायक शिंदे, राजेंद्र इंगोले, सोयजीत केदार, अनिल भोसले, बबनराव सावंत, सुभाष शिंदे, विलास होनमाने, विष्णुपंत केदार, किरण सावंत, दिपक बाड, डॉ.जयंत केदार, यशवंत बाबर, नंदकुमार बाबर, संजय गंभीरे, जगदीश केदार,श्रीनिवास क्षीरसागर, शिवाजी ठोकळे, यशोधन चव्हाण, श्रीकांत पाटील, संजय केदार, अनिल केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीपासून भाजपमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक होते. तालुक्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर पदाधिकाऱ्यांनी घराघरात कमळ पोहोचवले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. प्रगतीचे सरकार केंद्रात काम करत असून धाडशी निर्णय घेतले जात आहेत. तालुकाध्यक्ष पदासाठी तीन नावे आली होती. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना विचारात घेऊन तालुकाध्यक्ष पदासाठी निवड केली जाते. राज्यातील आघाडी बिघाडी काय होईल हे माहिती नाही. भविष्य काळात भाजपला पुन्हा एकदा मोठा जनाधार मिळेल. भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, विश्वासघात केला असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी भाजपचे जिल्हा संघटक राजकुमार पाटील म्हणाले, भाजपच्या सांगोला तालुकाध्यक्ष पदासाठी तालुक्यातील 11 जणांनी मुलाखती दिल्या होत्या. यावेळी 15 जुन्या कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतली. तालुकाध्यक्ष पदासाठी दोन नावामध्ये संघर्ष सुरू होता. नूतन तालुकाध्यक्ष म्हणून युवा नेते चेतनसिंह केदार-सावंत यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सांगितले. भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, भाजपने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. तालुक्यातील घराघरात भाजपचे विचार पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री आमदार सुभाषबापु देशमुख, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यात येईल. कार्यकर्त्यांमधून युवा उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्व जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments