शिवनेरी विकास कामासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 20, 2020

शिवनेरी विकास कामासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवनेरी विकास कामासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार





जुन्नरदि.19 - किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता तेवीस कोटी रुपयांचा  निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावूअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमांत ते बोलत होते. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळकामगार मंत्री दिलीप वळसे पाटीलसार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेपर्यटनमाहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरेखासदार डॉ.अमोल कोल्हेआमदार सर्वश्री अतुल बेनकेदिलीप मोहितेजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरेपी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातकृषी उत्पन बाजार समितीचे  सभापती संजय काळेविघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उप मुख्य मंत्री पवार म्हणालेपुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाहीयासाठी  जिल्ह्याचा 650 कोटी रु.चा वार्षिक आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी परिसर विकासासाठी 23 कोटी रु.चा निधी दिला जाईल. राज्याच्याआगामी अर्थ संकल्पात शेतकरीसर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे.  शालेय शिक्षणअंगणवाडयाआरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पवार म्हणालेशिवनेरी किल्ल्यावर  राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कारशिक्षण  यांची माहिती सर्वांना होण्यासाठी 'जिजाऊमाता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथया घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल.  तसेच वयस्कांच्या सोयीसाठी  रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संर्वधन  महत्त्वाचे आहे. बॉस्टन विद्यापीठात 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरुअशी 100 गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठ्यपुस्तकांतून महाराजांवरील  गौरवपर धड्याचा समावेश ही शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुणा धर्माविरुध्द नव्हतीतर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती. महाराजांचा कित्ता गिरवणेही आजची गरज आहे. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे नैतिकतेचे अधिष्ठान दिले, त्यामुळेच महाराजांच्या चरित्राचे गारुड आजही कायम आहे. वयस्कर लोकांना शिवनेरीवर येण्यासाठी रोप वे उभारण्याची व शिवनेरीवर शिवसंस्कार सृष्टी उभारण्याची मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी केली. कार्यक्रमात राष्ट्रपती पदक  विजेते माजी सहायक पोलिस आयुक्त वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार तर लाचलुचपत  प्रतिबंध विभागाचे  अपर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.  सुरवातीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्नर मार्केट कमिटी शाखेच्या नूतन शाखेचे   व एटीएम केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अतुल बेनके यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक घोलप यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages