विश्वगुरु महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव चषक टि १०
क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
सोलापूर.दि.२० फेब्रुवारी २०२०: विश्वगुरु जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमीत्त "बसव चषक टि १०" बसव प्रिमिअर लीग टि १० टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा दि. ९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२० दरम्यान शासकिय मैदान , विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असुन यामध्ये २० संघांचा सहभाग असणार आहे. २० संघांस २० संघ मालक निवड करण्यात येणार आहेत. २० संघ मालकांनी २० कर्णधार निवडायचे आहे. त्यानंतर संघातील इतर खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक संघ मालकांस १ लाख पॉईंट देण्यात येतील. त्या पाँईंटच्या माध्यमातुन संघातील इतर १४ खेळाडुंचे निवड करायचे आहे. खेळाडु निवड झाल्यानंतर संघ घोषित करण्यात येतील. स्पर्धा लिग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक मॅच आठ ओवरचे खेळविण्यात येणार असुन स्पर्धेस पुणे येथील पंच निमंत्रीत करण्यात आले आहेत. दि. १४ एप्रिल २०२०रोजी यु ट्युब चॅनलवरुन थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजयी संघास पंचाहत्तर हजार रुपये रोख व चषक तसेच उपविजेता संघास एकतीस हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात येणार आहे. वैय्यक्तिक पारितोषिकामध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, शिस्तबद्ध संघ यांना दोन हजार पाचशे रुपये व सन्मानचिन्ह तसेच बेस्ट विकेट किपर, बेस्ट फिल्डर यांना एक हजार शंभर रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याच बरोबर मॅन ऑफ दी सिरीज जिंकणाऱ्या खेळाडूंस पाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. "बसव चषक टि १०" बसव प्रिमिअर लीग टि १० टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैलमामा हत्तुरे यांच्या प्रेरणेतुन तथा सहकार्यातुन आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेस युवा उद्योजक अभिषेक हिप्परगी , राघवेंद्र जामगुंडी, गोरखसेठ चौधरी,अॅड. विजयकुमार कोनापुरे, काशिनाथ औरसंग यांच्या विशेष सहकार्यातुन पार पाडत आहे. या स्पर्धेमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील चारशेहुन अधिक खेळाडु सहभागी होणार असुन प्रत्येक सामना चुरशीचा होणार आहे. क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी सोलापूरातील क्रिडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावे असे आवाहन स्पर्धेचे आयोजक महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान चे प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर माळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस गोरखसेठ चौधरी, अॅड. विजयकुमार कोनापुरे, काशिनाथ औरसंग, अप्पा रामदासी, जयराज मडिवाळ व अमित रोडगे आदि उपस्थित होते.
0 Comments