अकलूज पोलिसांची मोका अंतर्गत कारवाई...
अकलूज (प्रतिनिधी) एकूण तेरा गुन्ह्यातील आरोपी गुंडाला मोठ्या शिताफीने सापळा लावून अटक केले अकलूज पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात गेली सात वर्षापासून फरार असलेला व विविध भागात एकूण तेरा गुन्ह्यातील आरोपी गुंड नामे विष्णू धर्मा कांबळे यास अकलूज पोलिसांनी शिवाजीनगर पुणे येथे सापळा लावून मोठ्या शिताफीने पकडून त्यास मोकामध्ये अटक केले असल्याची माहिती अकलूज पोलिसांनी दिली. अकलूज पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू व अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत निकम, पो. ना. विशाल घाडगे, पो. ना. शिवाजी पांढरे, पो. ना. अनिल शिंदे, पो. ना. सुभाष गोरे यांनी अकलूज पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात गेली सात वर्षापासून फरार असलेला गुंड विष्णू धर्मा कांबळे वय ४८ वर्षे राहणार १०९/११० रामनगर, रामटेकडी पुणे, सध्या गायकवाड वस्ती सरडेवाडी जवळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा शिवाजीनगर येथे येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच आरोपीस मोठ्या शिताफीने पकडून त्यास मोकामध्ये अटक केले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जाणारे अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी अकलूज शहरातील व हद्दीतील २३ गुंडांना काही दिवसापूर्वी तडीपार केले आहे आणि आता मोका सारखे त्यात जामीन नाही अशी कारवाई सुरू केली आहे.आरोपीगुंड कितीही हुशार असलातरी अकलूज पोलिसांच्या हातून सुटणार नाही हे अकलूज पोलिसांनी दाखवून दिले आहे. यावेळी बोलताना अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर म्हणाले की सदरच्या गुंडाने २०१४ला अकलूज येथे दरोडा टाकून मर्डर केला होता तर २०१८ला वडगाव निंबाळकर पुणे येथे दरोडा , २००७ ला जेजुरी येथे दरोडा,२०१४ ला हडपसर येथे सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्यास मारहाण केली होती. हडपसर येथे रॉबरी, पुन्हा हडपसर येथे रॉबरी व मर्डर, २०११ला इंदापूर येथे दरोडा नंतर याच वर्षी इंदापूर येथे दरोडा, परत इंदापूर येथे रॉबरी, कोथरूड येथे घरफोडी अशा विविध तेरा गुन्ह्यातील आरोपीला सापळा लावून अकलूज पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे. तर अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३५ गावे व अकलुज शहर येत असून जर का महिला, मुली, अपंग ,ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, गोरगरीब जनता, सामान्य नागरिक व समाजाला त्रास दिला तर तडीपार मोका व एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिला आहे.
0 Comments