स्व. पांडुरंग दादा शेळके यांच्या जन्मदिनानिम्मित भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन !
थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी भूमीत एका शेतकरी कुटुंबात स्वर्गीय पांडुरंग दादा शेळके यांचा जन्म झाला. राजकारणाबरोबरच समाजकार्य करीत असताना त्यांनी समाजातील तळागाळातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपली सेवा अखंडपणे कार्यरत ठेवली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या स्वर्गीय दादांना मर्दानी खेळ कुस्ती प्रचंड आवडायची त्यामुळे त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र समाधान शेळके व बाळासाहेब शेळके यांनी गावकऱ्यांच्या मदतीने हा विधायक उपक्रम म्हणून गावात भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान भरविले.
यावेळी अनेक नामवंत मल्लाने हजेरी लावली. या कुस्ती स्पर्धेसाठी पन्नास रुपयापासून पंचवीस हजार रुपये पर्यंतचे बक्षीस बक्षिसे बाळासाहेब शेळके मित्र मंडळ व समाधान शेळके मित्र मंडळ कोन्हेरी यांच्यावतीने देण्यात आले. या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन भैरवनाथ शुगर चे अध्यक्ष शिवाजी सावंत व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण रिमिक्स गाणी आणि संगीत पाणी याकडे आकर्षिला जात आहे. मर्दानी खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहेत. कोल्हापूर हे मला विद्यांचे केंद्र आहे. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्हा सुद्धा अशाच पद्धतीने केंद्र होण्यासाठी आजच्या तरुणांनी शरीरसंपत्ती मिळवावी. आणि रिमिक्सच्या मागे न धावता कुस्ती खेळाकडे वळावे असे आव्हान शिवाजी सावंत यांनी केले. तर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी कुस्तीपटूंना मोलाचे मार्गदर्शन केलं. चार तास बसून हा कुस्त्यांचा खेळ प्रमुख पाहुण्यांसह सर्वाना पाहीला. सहजासहजी खिशात हात न घालणाऱ्या प्रेक्षकानी निवेदक धोत्रे सर, धनाजी मदने, नंदकुमार गोसावी व यांच्या गोड वाणी मुळे लाखो रुपयांची बक्षिसे मल्लाना दिली.
मर्दानी खेळ कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी आपण या पुढील काळात सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे समाधान शेळके यांनी सांगितले.
स्वर्गीय पांडुरंग दादांची छबी कार्यक्रमानिमित्त दोघांमध्ये पहावयास मिळाले आहे.
जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव दाजी चौरे, रावसाहेब मगर, सरपंच शेलार नाना, शिवसेना तालुकाप्रमुख चरणराज चवरे, काँग्रेसचे उपाध्यक्ष देवानंद गुंड पाटील, मदन पाटील, दैनिक कटुसत्य वृत्तदर्पणचे संपादक पांडुरंग सुरवसे आदींचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
स्वर्गीय पांडुरंग दादा शेळके यांच्या जयंती कोन्हेरी गावत अतिशय दिमाखदार कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. गावातील आबालवृद्ध स्वर्गीय दादांच्या आठवणीने भूतकाळात रममाण झाला होता. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या शेतकरी नेत्यावर आजही प्रेम करणारी दादा प्रेमी पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले.
या कुस्ती मैदानावर रंजीत चौरे, बाळासाहेब चौरे, बाळासाहेब टेकळे, विजयकुमार कोकाटे, आबा चेंडगे, पोपट शेळके, रमेश माने, डॉ. वसेकर, अक्षय मुळे, भगवान दाडे, बाळू डोगरे, पांडू माने, बाळासाहेब मिटकरी, दीपक शेळके, हनुमंत जरग, आधीची प्रमुख उपस्थिती होती.
कुस्ती आखाड्याच्या व्यवस्थापन निलेश जरग, राजकुमार शेळके, सर्जेराव जरग, नंदू जराग, भाऊ शेळके, नंदू गोसावी, अजित कांबळे, तानाजी पांढरे, महेश शेळके, सज्जन पांढरे, बंडू मुळे, सलीम मुजावर आदींनी केले.
कुस्ती आखाडा यशस्वीतेसाठी सरपंच गणेश पांढरे, लक्ष्मण जाधव, चंद्रकांत सकट, कांतीलाल शेळके, आप्पासाहेब भोसले, अरुण कवडे, राजाभाऊ मुळे, दादा पाटोळे, सचिन चव्हाण, मोहन ऐवळे, सचिन पूळजे, राहुल आयवळे, बाप्पू डोंगरे, रोहिदास कांबळे, गोविंद केदार, नानासाहेब गवळी, पप्पू केदार, महेश लोंढे, अंकुश मिटकरी, अण्णा देवकते, रमेश कांबळे, भास्कर शेळके मानाजी शेळके आदींनी विशेष परिश्रम घेतले

0 Comments