स्व. पांडुरंग दादा शेळके यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर
नेतृत्व व कर्तृत्व हे माणसाच्या कार्यकुशलते वर अवलंबून असते. मिळालेल्या संधीचे सोने करून या संधीला विशाल रूप देतो, तोच जीवनात यशस्वी होतो. सर्वसामान्य व तळागाळातील माणसांच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वर्गीय पांडुरंग दादा शेळके यांनी शेतकरी हाच आपल्या कार्यक्षेत्राचा केंद्रबिंदू मानला. त्यामुळेच सहकारात व राजकारणात दादांच्या शब्दाला वजन होते. मोहोळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहूनच जनतेने त्यांना कार्यसम्राट ही पदवी दिली. त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा, असे आव्हान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे स्वर्गीय पांडुरंग दादा शेळके यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. यशवंत माने तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते शुगरचे चेअरमन तथ युवा नेते बाळराजे पाटील हे होते.
रक्तदान, वह्या वाटप, खाऊ वाटप, शालेय पुस्तक वाटप, आधार कार्ड, पॅन कार्ड, आरोग्य तपासणी शिबिर, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, राजीव गांधी योजनेअंतर्गत फ्रॅक्चर हाडावरील शस्त्रक्रिया, मणक्यावरील शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे हाडांची शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, प्रोस्टेट शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी ही सर्व शिबिरे युगांधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मथुराबाई दमानी हॉस्पिटल, ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय, जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर, माधव बाग मोहोळ, बाळासाहेब शेळके मित्र मंडळ, दादासाहेब विचार मंच आणि कै. पांडुरंग दादा शेळके पतसंस्था कोन्हेरी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पांडुरंग दादा शेळके यांच्या जयंतीनिमित्त मोफत व माफक दरात या सर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिरात डाॅ. अभिजित वडगावकर, डॉ. अमोल हराळे व डाॅ.स्वाती हराळे यांच्यासह अनेक डाॅक्टरांचे मार्गदर्शन लाभले.
स्वर्गीय पांडुरंग दादांनी शेतकरी टिकला तरच देश टिकेल शेतकऱ्यांचे हित हेच देशाचे हित हा दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावण्याचे महान कार्य करून भीमा सहकारी साखर कारखान्यावर परमनंट व्हाईस चेअरमन म्हणून अखंड काम केले. त्यामुळे आज स्वर्गीय दादांच्या जयंतीला संपूर्ण गाव जत्रे सारखा लोटलेला दिसून आला दादांच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या दिसल्या. दोन जानेवारी हा दिवस कोन्हेरीकरानी सणाप्रमाणे साजरा करून स्वर्गीय दादांना अभिवादन केलं. सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ असणाऱ्या स्वर्गीय पांडुरंग दादा शेळके युवकांचे प्रेरणास्थान होते. सहकार व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या स्वर्गीय दादांच्या कार्याविषयी कार्याविषयी आपले मत मांडताना आमदार यशवंत माने यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तर गरिबांच्या हाताला धरून चालणाऱ्या या माणसाचा सामान्य माणसाला आधार होता. सहकारातील सहयोगी वृत्ती दादांच्या नसानसात भिनली होती. कोन्हेरी पंचक्रोशीत आपल्या उत्तम संघटन कौशल्य व स्वर्गीय दादांनी अनेक माणसांना जवळ केलं म्हणूनच त्यांच्या जयंतीला गावातील तमाम नागरिक आहेत. जनतेच्या मनात घर केलेल्या या व्यक्तीमहत्त्वाविषयी बोलताना युवकांचे नेते बाळराजे पाटील यांनीही त्यांच्या जुन्या आठवणीं सांगितल्या.
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना माजी व्हाईस चेअरमन कल्याणराव पाटील यांनीही अनेक प्रसंग सांगितले.
याप्रसंगी माजी उपसभापती मानाजी माने, पंचायत समिती सभापती रत्नमाला पोतदार, जिल्हा तालीम संघाचे सर्जेराव चौरे, हरिभाऊ चौरे, सिंधुताई वाघमारे, सरपंच अर्चना पांढरे, माजी सरपंच भीमराव जरग, आदी मान्यवर उपस्थित होते. भव्य जंगी कुस्त्याचा समारोप झाल्यानंतर रात्री डान्स स्पर्धेत पंचक्रोशीतील तरुणाने बांगडा डान्स ही सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेमुळे लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान शेळके, बाळासाहेब शेळके, डॉ. बालाजी माने संजय जरग, प्रवीण शेळके, बाबुराव शेळके, सज्जन कांबळे, सुधीर शेळके, डॉ. दयानंद गांजाळे, पोपट शेळके, सुजित शेळके, बालाजी चव्हाण, महेश लोंढे, अनिल पूळजे, वीरेंद्र हिंगमिरे, अमोल गवसणे, अमोल पाटील, बिभिषन शेळके, भारत गुंड, जहांगीर मुजावर, आदींनी अथक परिश्रम घेतले राजेंद्र गुंड, बाळासाहेब शेटे, राहुल कौलगे, अण्णा शेटे, धर्मराज कांबळे, गणेश पांढरे, सुजित शेळके, बालाजी गुंड, सागर गुंड, मोहन काळे, आप्पा गाडे, आदींनी विशेष समन्वयक म्हणून काम केले.

0 Comments