Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व .बाबुराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर

                 स्व .बाबुराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर




बार्शी प्रतिनिधी  :  सूरज कला व क्रिडा मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व .बाबुराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार संस्थापक सचिव रवि कापसे यांनी जाहीर केले.अकरा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सात जानेवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.अर्णव शैक्षणिक संकुल सासुरे फाटा वैराग येथे उद्योगपती शिवाजीराव डिसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  स्व .बाबुराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा, रक्तदान शिबिर आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रमुख पाहूणे म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, सभापती अनिल डिसले, नगराध्यक्ष असिफ तांबोळी,उपसभापती मंजुळा वाघमोडे,जेष्ठ साहित्यिक राजेंद्र दास,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, मा. जि.प संतोष निंबाळकर, जि .प. सदस्य मदन दराडे,पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.संस्थासचिव रविंद्र कापसे आणि मुख्याध्यापिका अर्चना डिसले यांनी पुरस्कार जाहीर केले यामध्ये प्रताप गोरे -सामाजिक क्षेत्र, हभप सुधाकर इंगळे महाराज - आध्यात्मिक क्षेत्र, धनाजी शिंदे-पत्रकारिता क्षेत्र,उमेश सुळ-क्रिडा क्षेत्र,  डॉ. प्रकाश थोरात -शैक्षणिक क्षेत्र,भगवंत ब्लड बँक- सामाजिक संस्था क्षेत्र, दत्ता गोसावी - सांस्कृतिक क्षेत्र, ज्ञानेश्वर दूधाणे -कला क्षेत्र, आनंद  गोसकी -आरोग्य सेवा, अमोल गवारे -युवा क्षेत्र तर प्रकाश जडे-साहित्य क्षेत्र यांचा समावेश आहे. स्व .बाबुराव डिसले स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी अर्णव शैक्षणिक संकुलातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन ही गौरविण्यात येणार आहे. सोमवारी ६ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलन मंगळवारी सात तारखेला संपन्न होणार असल्याचे ही संस्था सचिव रविंद्र कापसे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments