Hot Posts

6/recent/ticker-posts

गीता अभ्यास मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

गीता अभ्यास मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न



पंढरपूर - योगेश्वर पुरूषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट पंढरपूर संस्थापक स्वातंत्र्यसैनिक स्व.पुरूषोत्तम बाबुराव अढवळकर यांनी सुरू केलेल्या गीता अभ्यास मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गीता पाठांतर व लेखन स्पर्धेतील गुणवंतांना पारितोषिक वितरण समारंभ डॉ.सचिन लादे व मनिषा पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते रविवार दि.5 जानेवारी रोजी केमिस्ट भवन पंढरपूर येथे संपन्न झाला. यामध्ये तीन गट विभागणीत प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे 54 गुणवंतांचा पारितोषिक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात योगेश्वर पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्ण व स्वातंत्र्यसैनिक स्व .पुरूषोत्तम बाबुराव अढवळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .मनिषा सिध्देश्वर पाटील या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सचिन लादे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कार्यवाह मिलिंद अढवळकर यांनी केले.  संकल्पवाचन छाया अढवळकर यांनी केले.  ट्रस्टचा अहवाल वाचन शोभाताई कुलकर्णी यांनी केले. गीता पठण कु.नारायणी राहिरकर हिने केले.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सचिन लादे म्हणाले की, गीता शिक्षण म्हणजेच एक कर्मयोग,ज्ञानयोग व भक्तीयोग आहे. भगवतगीता ही सर्वांची असून त्याचे पालन व आचरण सर्वांनी केले पाहिजे. ही गीता शिकविण्याचे सत्कृत्य पंढरपुरातील गीता अभ्यास मंडळाच्या माध्यमातून होते ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरून .मनिषा सिध्देश्वर पाटील म्हणाल्या की, गीता अभ्यासाच्या माध्यमातून लहान मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार केले जातात हे महान कार्य असल्याचे सांगितले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव गुणे, शुभदा गुणे, दमयंती अंाधळगावकर, शोभा ढवळसकर, विद्या कुलकर्णी, अंजली भाटेकर,अलका पुजारी यांच्यासह सर्व स्पर्धक, पालक व गीताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार द.सी.जोशी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहिणी नारायण यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments