Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला गुरुकुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन "स्पर्श २०१९-२०" हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपुर्ण वातावरणात संपंन्न


सांगोला गुरुकुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन "स्पर्श २०१९-२०" हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपुर्ण वातावरणात संपंन्न 









शिक्षणाविष्कार बहुद्देशिय व संशोधन संस्था संचलित, सांगोला गुरुकुल सांगोला (मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा) आयोजित, वार्षिक स्नेहसंमेलन "स्पर्श २०१९-२०" हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपुर्ण वातावरणात संपंन्न  शोध नवा.... दुरावलेली नाती जोडण्याचा प्रयत्न सांगोला गुरुकुलच्या "स्पर्श २०१९-२०" या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा.श्री.संतोष राऊत साहेब (गट विकास अधिकारी पंचायत समिती, सांगोला)  प्रमोद बोराडे बोराडे डायग्नोस्टिक सेंटर, सांगोला) सोमनाथ शिंदे (माजी सरपंच आकोला-वासु शिवाजी लाडे(अध्यक्ष-अभिनव पब्लिक स्कुल आजनाळे) सचिन गोडसे(अध्यक्ष- एस.बी.एस.एस,आयडियल पब्लिक स्कुल धायरी,पुणे) हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. सायंकाळची वेळ म्हणुन बसाव म्हणटलं,अंगणात खुर्ची टाकली. नि आभाळात मावळत्या सुर्याकडे पाहत बसलो तर काय, नातु आंगणात आला आणि म्हणाला.आजोबा चला सांगोला गुरुकुलचा "स्पर्श २०१९-२०" कार्यक्रम सुरु झालाय. मी नातवाबरोबर आलो तर खरचं की,मनाला भावनारे तेथील सुंदर मनमोहक वातावरण,मी जणू स्वप्नात पाहतोय असे सजवलेलं स्टेज, स्टेजकडे पाहिल्यावर मनाला भास झाला की आपण स्वर्गात तर आलो नाहीना. आजुन पुढे पाहतो तर काय महाराष्ट्रातील सांस्कृतिक ग्रामीण भागाचे उभेऊभ दर्शन. गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी गीतातून सादर केले.तेंव्हा मला माझ्या तरुणपणाच्या आठवणींना उजाळा सांगोला गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दिला. त्याच बरोबर शेतकऱ्यांची व्यथा या मुलांनी उभेऊभ मांडली हे पाहताना डोळ्यांत पाणी आलं राव.पुढे पाहतो तर काय आज आपल्या समाजाला भ्रष्टाचाराच्या या वाळवीने आपल्या समाजाला किती पोखरलयं हे या मुलांनी आज दाखवून दिलयं,आपण वेळीच सावध झालो नाही. तर आपला भुसा झाल्याशिवाय राहणार नाही. किती सांगु तुम्हाला या मुलांनी आई-बाबा विषयी भावना,पाण्याविषयी जनजागृती,आपल्या भारतभुमी विषयीच्या भावना किती छान गीतामधून प्रकट केलेल्या आहेत.हे सर्व पाहिल्यावर मनाला स्पर्श आणी काळजाला भिडल्याशिवाय राहणार नाही.खरचं सांगोला गुरुकुलचा "स्पर्श २०१९-२०" मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही.सदर कार्यक्रमाचे सुञसंचालन सोनाली ढोरे व आभार वैशाली गाडेकर यांनी मानले.संस्थेचे सचिव/सांगोला गुरुकुलचे मुख्याध्यापक मा.श्री.गाडेकर सर यांचे मार्गदर्शन  लाभले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षिका  व इतर कर्मचारी यांचे मालाचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments